सौ.के.एस.के. महाविद्यालयात राष्ट्रीय सदभावना दिन साजरा.
बीड : येथील सौ.केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर ऊर्फ काकू कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात माजी पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांची जयंती राष्ट्रीय सदभावना दिन म्हणून साजरी करण्यात आली. या निमित्त महाविद्यालयात सदभावना प्रतिज्ञा सामुहिक रित्या घेण्यात आली.या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शिवानंद क्षीरसागर हे उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्राचार्य म्हणाले की, आपण सर्वानी जातीसंप्रदाय,धर्मभाषा या विषयी भेदभाव न करता सर्व भारतीयांनी एकात्मतेने व सदभावनाने राहिले पाहिजे. अंहिसेच्या मार्गाने संवैधानिक पध्दतीन आपण राहिले पाहिजे असे विचार व्यक्त केले.
या कार्यकमासाठी महाविद्यालयातील उपप्राचार्य डॉ.संजय पाटील देवळाणकर,उपप्राचार्य डॉ्र.शिवाजी शिंदे,पदव्युत्तर संचालक डॉ.सतीश माऊलगे,कमवि उपप्राचार्य डॉ.एन.आर.काकडे,पर्यवेक्षक जालिंदर कोळेकर आदीसह महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थिनी व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.विनायक चौधरी, सूत्रसंचालन डॉ.पांडूरंग सुतार व आभार प्रदर्शन प्रा.ए.डी.खुटाळे यांनी मानले.