महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्‍वविद्यालयात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त राष्ट्रीय परिसंवाद संपन्न

मराठी भाषा, साहित्याचा इतिहास समृद्ध, उज्ज्वल आणि प्राचीन आहे – प्रो. सुनील कुलकर्ण

वर्धा : महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्‍वविद्यालयात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त 27 फेब्रुवारी रोजी ‘भारतीयतेच्या दृष्टिकोनातून मराठी भाषा आणि साहित्याचे योगदान’ या विषयावर कुलगुरू डॉ. भीमराय मेत्री यांच्या अध्यक्षतेखाली गालिब सभागृहात आयोजित राष्ट्रीय परिसंवादात केंद्रीय हिंदी संस्‍थान, आग्राचे निदेशक प्रो. सुनील कुलकर्णी म्हणाले की मराठी भाषा आणि साहित्याचा इतिहास समृद्ध, उज्ज्वल आणि प्राचीन आहे. मराठी भाषेचे साहित्य देश-विदेशात पोहोचवण्यात अनुवादाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. स्वातंत्र्याच्या काळात मराठी साहित्यिकांनीही मोठे योगदान दिले आहे. संत ज्ञानेश्वर, तुकाराम, चोखामेळा, नामदेव, सावता माळी आदी संतांनी मराठी समृद्ध केली आहे. भावाभिव्‍यक्‍ती सक्षम आणि सामर्थ्‍यवान बनवण्याचे काम मराठीने केले आहे. ऑनलाइन संबोधित करताना ते म्हणाले की मराठी भाषेतील समृद्ध साहित्याचे हिंदी आणि इतर भारतीय भाषांमध्ये भाषांतर झाले पाहिजे. मुंबईचे डॉ. नरेंद्र पाठक यांनी मराठी आणि हिंदीला भगिनी संबोधले आणि मराठी भाषा आणि संस्कृती समृद्ध करण्यात संत ज्ञानेश्वरांपासून विष्णू वामन शिरवाडकर यांच्या योगदानावर चर्चा केली.

Advertisement

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विश्‍वविद्यालय, नागपूरचे भारतभूषण शास्त्री भक्ती पंथावर चर्चा करताना म्हणाले की चक्रधर स्वामी गुजरातमधून आले आणि त्यांनी महाराष्ट्रात मराठीचा विकास केला. महाराष्ट्रातील रिद्धपूर येथे मराठीचा मूळ ग्रंथ ‘लीळा चरित्र’ लिहिला गेला. महापुरुषांच्या तात्विक ज्ञानावर संशोधनाची गरज त्यांनी व्यक्त केली. नांदेडचे डॉ. पृथ्वीराज तौर म्हणाले की मराठी भाषेत समन्वयाची दृष्टी आहे. हेच कारण आहे की मराठी भाषेने एकाच वेळी उत्तर आणि दक्षिणेचे तत्त्वज्ञान अंगिकारले. स्वागतपर भाषणात साहित्य विद्यापीठाचे अधिष्‍ठाता प्रो. अखिलेश कुमार दुबे म्हणाले की मराठी साहित्य हे भारतीय जीवनदृष्टी आणि मूल्यांना बळ देणारे साहित्य आहे. संतांच्या योगदानामुळे मराठी भाषा आणि साहित्यात भारतीयत्व दृढ झाले. परिसंवादाचे संयोजक भाषा विद्यापीठाचे अधिष्‍ठाता प्रो. अवधेश कुमार यांनी प्रास्ताविक करताना मराठी संतांनी राष्‍ट्राचे एकीकरण व भक्तीमार्गाला चालना देण्यासाठी दिलेल्या योगदानावर चर्चा करून दलित साहित्याचे योगदान अधोरेखित केले.

या प्रसंगी महाराष्‍ट्र, राज्‍य हिंदी साहित्‍य अकादमी, मुंबईचे कार्याध्‍यक्ष प्रो. शीतला प्रसाद दुबे, देगलूरचे डॉ. रवीन्‍द्र बैजनाथ बेम्‍बरे, हिंदी विश्‍वविद्यालयाचे एसोशिएट प्रोफेसर डॉ. बालाजी चिरडे, अनुवाद व निर्वचन विद्यापीठाचे सहायक प्रोफेसर डॉ. रामप्रकाश यादव आदींनी मराठी भाषा आणि साहित्यातील योगदानावर प्रकाश टाकला.

कार्यक्रमाचे संचालन दूरशिक्षण निदेशालयाच्‍या सहायक प्रोफेसर डॉ. तक्षा शंभरकर यांनी केले. भाषाशास्त्र विभागाचे अध्‍यक्ष डॉ. एच. ए. हुनगुंद यांनी आभार मानले. डॉ.जगदीश नारायण तिवारी यांनी मंगलाचरण सादर केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी डॉ. उमेश कुमार सिंह, डॉ. के. बालराजु, डॉ. राजेश लेहकपुरे, डॉ. अनवर अहमद सिद्दीकी, डॉ. संदीप सपकाळे, डॉ. धर्मेन्‍द्र शंभरकर, डॉ. रूपेश कुमार सिंह, डॉ. राम कृपाल, डॉ. कोमल कुमार परदेशी, डॉ. रणंजय कुमार सिंह, डॉ. समरजीत यादव, डॉ. प्रदीप, सन्‍मती जैन, डॉ. श्रीनिकेत कुमार मिश्र, बी. एस. मिरगे, डॉ. अमित विश्‍वास यांच्‍या सह शोधार्थी व विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page