राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त व्याख्यानाचे बुधवारी आयोजन
नागपूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९५ व्या जयंतीनिमित्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात बुधवार, दि १९ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी १०:३० वाजता व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

जमनालाल बजाज प्रशासकीय भवनातील सभागृहात आयोजित जयंती कार्यक्रमात श्रीमती कोकिळाबाई गावंडे महिला महाविद्यालय दर्यापूर येथील मराठी विभागातील डॉ हरिदास देविदास आखरे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहत ‘छत्रपती शिवरायांचा लोक कल्याणकारी स्वराज्य विचार’ या विषयावर व्याख्यान देतील. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रभारी कुलगुरू डॉ प्रशान्त बोकारे भूषविणार असून प्र-कुलगुरु डॉ राजेंद्र काकडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन कुलसचिव डॉ राजू हिवसे यांनी केले आहे.