सीताबाई नरगुंदकर नर्सिंग महिला महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा
नागपूर : महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या सीताबाई नरगुंदकर नर्सिंग महिला महाविद्यालयात २१ जून २०२५ रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. योग दिनाची थीम “एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग” हि होती.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे योग शिक्षक दत्तात्रेय कुलकर्णी, प्रकाश खांडेकर आणि प्रभाताई खांडेकर हे होते. दत्तात्रेय कुलकर्णी आणि प्रभाताई खांडेकर यांनी विद्यार्थिनींना शारीरिक आणि मानसिक आरोग्य राखण्यासाठी योगाचे महत्त्व समजावून सांगितले. त्यांनी काही योग आसने करून दाखवली आणि त्यांचे महत्त्व स्पष्ट केले. बी एससी नर्सिंग चौथ्या सत्राच्या विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार आणि योग आसने सादर केली. या दिवशी महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर स्टाफ आणि विद्यार्थ्यांनी योग आसने करण्यात सक्रिय सहभाग घेतला.
महाविद्यलयाचा प्राचार्या डॉ रूपा वर्मा यांचा मार्गदर्शनाखाली कार्यक्रम समन्वयक प्राध्यपिका काजल घाटे तसेच स्पोर्ट टीचर भारती पेंदाम यांनी या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले.
