राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवात सोलापूर विद्यापीठाची ऐतिहासिक कामगिरी !

ॲथलेटिक्स मुलांच्या संघाला सर्वसाधारण तृतीय विजेतेपद

सात सुवर्ण आणि दोन रौप्य पदके प्राप्त

सोलापूर : महामहीम राज्यपाल कार्यालय आयोजित राज्यस्तरीय क्रीडा महोत्सव राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ येथे संपन्न झाला. या महोत्सवात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरच्या ॲथलेटिक्स विभागातील खेळाडूंनी ऐतिहासिक आणि देदिप्यमान कामगिरी केली आहे. सात सुवर्ण आणि दोन रौप्य पदकासह मुलांच्या ॲथलेटिक्स संघाला सर्वसाधारण तृतीय विजेतेपद मिळाले आहे.

मुलांच्या तृतीय विजेतेपदासह दहा बक्षीसे प्राप्त करत ॲथलेटिक्सचा मुला-मुलींचा संघ सर्वसाधरण विजेतेपदाच्या शर्यतीत एका गुणाने चौथ्या क्रमांकावर राहिला. विद्यापीठाच्या इतिहासात प्रथमच ॲथलेटिक्स विभागात इतकी पदके विद्यापीठाला मिळाली आहेत. आणखीन काही स्पर्धा व क्रीडा महोत्सव डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, लोणेरे येथे होणार असल्याने तेथे अजून पदके मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे यावर्षी क्रीडा महोत्सवात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा संघ चांगली कामगिरी करण्याच्या दृष्टीने वाटचाल करतो आहे. क्रीडा महोत्सवात पुढील खेळाडूंनी पदके प्राप्त केली आहे.

Advertisement

या खेळाडूंची चमकदार कामगिरी

१. संतोषी देशमुख -थाळीफेक -सुवर्णपदक

२. अरूण राठोड-१५०० मिटर-सुवर्णपदक

३. अरूण राठोड-५००० मिटर-सुवर्णपदक

४. सायली टोणपे-८०० मिटर-सुवर्णपदक

५. सुजाता बाबर-उंच उडी-सुवर्णपदक

६. निरज महानवर-भालाफेक-सुवर्णपदक

७. आकांक्षा गावडे-२०० मिटर-सुवर्णपदक

८. आकांक्षा गावडे-१०० मिटर-रौप्यपदक

९. दिनकर विनीत-१०० मिटर-रौप्यपदक

१०. मुलांचा संघ-जनरल चॅम्पियनशीप तृतीय

संघाचे प्रशिक्षक व संघप्रमुख म्हणून डॉ. किरण चोकाककर आणि संघ समन्वयक डॉ. अशोक पाटील यांनी काम पाहिले. सर्व यशस्वी खेळाडूंचे कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर, प्र-कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे, क्रीडा विभागाचे प्रभारी संचालक डॉ. केदारनाथ काळवणे आदींनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page