जी एच रायसोनी इंटरनॅशनल स्किल टेक युनिव्हर्सिटीतर्फे प्रत्यक्ष समस्यांना सोडविण्यासाठी हॅकाथॉनचे आयोजन
पुणे : जी एच रायसोनी इंटरनॅशनल स्किल टेक युनिव्हर्सिटीच्या डेव्हलपर क्लबने विद्यार्थ्यांसाठी प्रत्यक्ष येणाऱ्या समास्यांच्या समाधाना शोधण्यासाठी हॅकाथॉनचे आयोजन केले होते. यात ४५ पेक्षा जास्त विद्यार्थी व सहा संघांनी सहभाग घेतला होता. या हॅकाथॉनमधून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष समस्यांचा सामना करण्यासाठी नविन उपाय शोधण्याची संधी मिळाली. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा डॉ एम यू खरात यांच्या हस्ते हॅकाथॉनचे उद्घाटन करण्यात आले. प्रा अनुराज बोस आणि प्रा समीम अत्तार हे कार्यक्रमाचे समन्वयक होते.
कुलगुरू प्रा डॉ एम यू खरात म्हणाले की, विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कल्पना आणि उत्तम तांत्रिक कौशल्ये सादर केली. विशेष म्हणजे दोन-तीन उपाय विशेष कौतुकास्पद ठरले. तर एक विशेष कल्पना अधिक विकासानंतर सायबर-विद्या प्लॅटफॉर्ममध्ये समाविष्ट करण्याची क्षमता दाखवते. अशा नव्या विद्यार्थ्यांनी दाखवलेली नविन कल्पकता प्रत्यक्ष आव्हानांना सामोरे जाण्यासाठी त्यांची तयारी दाखवते.
या हॅकाथॉनमुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या कौशल्यांचा विकास करण्यासाठी प्रोत्साहन मिळाले आणि भविष्यातील आव्हानांवर उपाय शोधण्यासाठी प्रेरणा मिळाली आहे.
रायसोनी एज्युकेशनचे अध्यक्ष सुनील रायसोनी आणि कार्यकारी संचालक श्रेयस रायसोनी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.