गोंडवाना विद्यापीठात गणित दिवस उत्साहात साजरा

संशोधन करून गोंडवाना विद्यापीठ आणि समाजाचे नाव उज्वल करावे – कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे

गडचिरोली : भारतीयांची नैसर्गिक बुद्धिमत्ता गणितात अतिशय समृद्ध आहे. जगाला शून्याचे देणगी भारताने दिली. गणित सगळीकडे निसर्गतः भरलेले आहे. अनेक उदाहरणांनी हे सिद्ध करता येईल. आपल्या दैनंदिन जगण्याचा भाग गणित आहे. त्यामुळे गणिताचा बाऊ न करता श्रीनिवास रामानुजन सारख्या गणित तज्ञांकडून प्रेरणा घ्यावी आणि मुळात ते शिकून भारताच्या गणिताच्या ज्ञानाला येणाऱ्या पिढीने समृद्ध करावे. गणिताच्या संदर्भात नवनवीन शोध लावावे. अजूनही कॉम्प्लेक्स नंबरच्या संदर्भात जागतिक स्तरावर काहीअम्बीगुटीज आहेत. त्या दूर करण्यासाठी विद्यार्थ्यांनी आणि प्राध्यापकांनी परिश्रम घ्यावे, संशोधन करावे .संशोधनासाठी कधीही निधी कमी पडू देणार नाही. गणिताच्या काही कूट प्रश्नांना जर उत्तर, समाधान गोंडवाना विद्यापीठाला देता आले तर ते मला वाटते गणित दिवसाच्या निमित्ताने गोंडवाना विद्यापीठासाठी एक मोठी उपलब्धी ठरेल आणि गणित दिवस एक दिवस साजरा न करता वर्षभर करावा आणि संशोधन करून गोंडवाना विद्यापीठ तसेच समाजाचे नाव उज्वल करावे अशी अशा त्यांनी व्यक्त केली.

Advertisement

गोंडवाना विद्यापीठात नॅशनल काँसिल फॉर सायन्स अँड टेकनोलॉजी कमुनिकेशन, डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेकनोलॉजी भारत सरकार आणिन राजीव गांधी सायन्स अँड टेकनोलॉजी कमिशन , महाराष्ट्र शासन यांच्या सहकार्याने तसेच पदव्युत्तर शैक्षणिक गणित विभागाच्या वतीने राष्ट्रीय गणित दिवस आज साजरा करण्यात आला . त्यावेळी ते बोलत होते. या वेळी मंचावर विशेष उपस्थिती म्हणून कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण, वक्ते म्हणून मुंबई विद्यापीठाचे स. प्रा. दीपक सारवे, एल. एडी. कॉलेज नागपूर, डॉ. पायल हिरनवार, एन. एस. सायन्स कॉलेज, मूलचेरा ज्ञानदेव पुसतोडे, गणित विभागप्रमुख सुनिल बागडे, आदींची उपस्थिती होती.उपस्थित वक्त्यांची गणित विषयावरील व्याख्याने झाली.

यानंतर गणित विभागाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पोस्टर प्रदर्शनीची मान्यवरांनी पाहणी करत विद्यार्थ्यांचे कौतुक केले. प्रास्ताविक गणित विभागाचे विभाग प्रमुख डॉ. सुनिल बागडे यांनी केले. संचालन विद्यार्थ्यांनी आश्विनी गायकवाड,आभार विकास आचेवार कार्यक्रमाला सर्व विद्यार्थी तसेच स. प्रा. यांची मोठया संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स. प्रा. संदीप कागे, शिवाजी चेपटे, अमोल पिंपळकर या सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page