दत्ता मेघे अभिमत विद्यापीठात ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
राष्ट्रीय एकात्मतेची वीण घट्ट करा – डाॅ ललित वाघमारे
वर्धा : भारत देश हा विविध जाती, धर्म, पंथ आणि मतप्रवाहांनी बनलेला आहे. ‘विविधतेत एकता’ हे या राष्ट्राचे वैशिष्ट्य आहे. कितीही संकटे आली तरी ही एकात्मतेची वीण उसवू न देता अधिक घट्ट करण्याची जबाबदारी युवा पिढीवर आहे, असे प्रतिपादन कुलगुरू डाॅ ललितभूषण वाघमारे यांनी सावंगी येथील दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था अभिमत विद्यापीठात आयोजित भारताच्या ७८ व्या स्वातंत्र्यदिन समारोहात केले.
या समारोहात प्रारंभी विद्यापीठातील एम एस्सी प्रथम वर्षाची गुणवंत विद्यार्थिनी वैष्णवी धोंगडे हिच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मंचावर प्रकुलगुरू डाॅ गौरवकुमार मिश्रा, कुलसचिव डॉ श्वेता काळे पिसूळकर, प्रशासकीय महासंचालक डॉ राजीव बोरले, मुख्य समन्वयक डॉ एस एस पटेल, संचालक डॉ तृप्ती वाघमारे, परीक्षा नियंत्रक डॉ सुनीता वाघ, संचालक डॉ जयंत वाघ, संशोधन व विकास विभागाचे संचालक डॉ जहीरुद्दीन काझी, जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ अभय गायधने, दत्ता मेघे औषधीनिर्माणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अनिल पेठे, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान शाखेचे अधिष्ठाता डॉ केटीव्ही रेड्डी, आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ चंद्रशेखर महाकाळकर, विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी संजय इंगळे तिगावकर, मानव संसाधन विभागाचे उपसंचालक अजय पुनवटकर, कर्नल कुलदीप सहगल, डॉ वैभव अंजनकर, डॉ आशिष अंजनकर तसेच विविध महाविद्यालयांचे अधिष्ठाता, उपअधिष्ठाता, प्राचार्य, उपप्राचार्य यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी, राष्ट्रपिता महात्मा गांधी व स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पं जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करण्यात आले. तसेच, राष्ट्रगीत गाऊन आणि राष्ट्रध्वजाला सलामी देऊन स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमाचे संचालन सुमित उगेमुगे यांनी केले. कार्यक्रमाच्या आयोजनात क्रीडा अधिकारी अफसर पठाण, हेमंत पुंडकर, प्रशासकीय अधिकारी व शिक्षकेतर कर्मचारी वृंदाचे सहकार्य लाभले. या समारोहाला संस्थेतील विभाग प्रमुख, शिक्षक, अधिकारी, कर्मचारी, सुरक्षारक्षक पथक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.