डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील सुरक्षा व्यवस्थेमुळे विद्यार्थिनीची हरवलेली बॅग परत मिळाली
मूळ शैक्षणिक कागदपत्रे मिळाली परत
छत्रपती संभाजीनगर : शाळा, महाविद्यालये व विद्यापीठातील सर्व मूळ कागदपत्रांची बॅग शोधून देण्यात सुरक्षा विभागाला यश आले आहे. विशेष म्हणजे सदर रिक्षाचा क्रमांक व चालकाचे नाव काही माहिती नसताना सीसीटीव्हीच्या माध्यमातून प्रयत्न करून विद्यापीठ प्रशासनाने ही बॅग परत मिळून दिली.
डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील व्यवस्थापनशास्त्र विभागातील प्रथम वर्षाची विद्यार्थिनी पायल आर्जुन घाडगे या विद्यार्थीनीची मंगळवारी ( दि ३०) सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास आपल्या घरुन परत विद्यापीठात ऑटो रिक्षाने विद्यापीठाच्या वसतिगृहात आली. मात्र यावेळी या विद्यार्थीनीची बॅग रिक्षातच विसरुन गेली. ही बाबतीच्या लक्षात आल्यानंतर पायल धाडगे हीने विद्यापीठाचे कुलसचिव डॉ प्रशांत अमृतकर यांना गुरुवार (दि २ मे रोजी लेखी पत्राद्वारे कळविले.
यावेळी ताबडतोब विद्यापीठाचे कुलसचिव डॉ प्रशांत अमृतकर यांनी सुरक्षा अधिकारी बाळू इंगळे यांना सविस्तर माहिती दिली. तसेच कुलसचिव यांनी विद्यापीठातील युनिक विभाग ते विद्यापीठ गेटवरील सर्व सीसीटीव्ही कॅमराचे फुटेज तपासण्यास सांगितले. यामध्ये रिक्षा क्र एम एच २० ई ३२४६ या रिक्षामध्ये बॅग असल्याचे समजल्यावर सुरक्षा अधिकारी यांनी हा नंबर शहर ट्रॉफिक पोलीस पवार यांच्याशी संपर्क साधून त्यांना देण्यात आला. सदरील पोलीसांनी ऑटो रिक्षा चालकाशी संपर्क साधून पायल धाडगे या विद्यार्थ्यांची हरवलेली बॅग परत मिळवून दिली. वरील सर्व तपासाला चार तासात यश मिळाले.