शरदचंद्रजी पवार होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजमध्ये डॉ बाबासाहेब आंबेकर जयंती उत्साहात साजरी
श्रीरामपूर : महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथी मुंबई, राष्ट्रीय होमिओपॅथी आयोग नवी दिल्ली, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक, शरदचंद्रजी पवार होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल श्रीरामपूर, आयुष संचनालय मुंबई, राष्ट्रीय सेवा योजना व कम्युनिटी मेडिसिन विभागाअंतर्गत संस्थेचे चेअरमन डॉ बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ व्या जयंती निमित्त वेगवेगळे उपक्रम साजरे करण्यात आले. सदर कार्यक्रमामध्ये पदयात्रा, आरोग्य शिबीर, रांगोळी स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, प्रतिज्ञा, शालेय आरोग्य तपासणी स्वच्छता अभियान, पोषण पंधरवाडा, कॅन्सर अवेरनेस प्रोग्राम, अश्या प्रकारचे उपक्रम राबविण्यात आले.



दि २४/०३/२०२५ ते २३/०४/२०२५ या कालावधीत महात्मा ज्योतिबा फुले, डॉ हानेमन, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर या सर्वांच्या जयंती निमित्त महाविद्यालयामध्ये वेगवेगळे उपक्रम राबविण्यात आले. दि १२/०४/२०२५ रोजी महाविद्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त रांगोळी स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, प्रतिज्ञा घेण्यात आली. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शिवा ट्रस्ट चे संचालक दिलीपदादा पवार यांनी स्वीकारले, तर कार्यक्रमाकरिता प्रमुख पाहुणे म्हणून डॉ क्षितिजा इंगळे वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र सोनई या उपस्थित होत्या. त्यांचा सत्कार महाविद्यालयाच्या अधिव्याख्याता डॉ दीप्ती गाडेकर यांनी शाल व श्रीफळ देऊन केला.
सदर कार्यक्रमात डॉ बाबासाहेब आंबेडकर, डॉ हानेमन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व त्यांना दीप प्रज्वलन व पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली. तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून महाविद्यालयाच्या इमारती वरती बॅनर झळकविण्यात आले व घोषणा देण्यात आल्या. तसेच जयंती निमित्ताने शिरसगाव व निपाणी या दोन गावांमध्ये मोफत आरोग्य शिबिरे डॉ रिजवान अहमद यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. शिबिरामध्ये आरोग्य तपासणी करून मोफत औषधे देण्यात आली व आरोग्याची काळजी कशी घ्यायची याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. सदर शिबीर २३ एप्रिल पर्यंत सुरु राहणार आहेत. तरी गरजू गोरगरीब रुग्णांनी सदर शिबिरांचा फायदा घ्यावा असे आवाहन डॉ रिजवान अहमद यांनी केले.
दि १४/०४/२०२५ रोजी महाविद्यालयाच्या प्रांगणात व गावामध्ये पदयात्रा काढण्यात आली. सदर पदयात्रेमध्ये संस्थेचे संचालक दिलीपदादा पवार, प्रशासकीय अधिकारी श्रीकांतजी पवार, शरदचंद्रजी पवार होमिओपॅथी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ रिजवान अहमद, सुप्रीयादिदि सुळे नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य प्रशांत वाघमारे, अजितदादा पवार पॉलीटेक्नीक कॉलेजच्या प्राचार्य पूनम बोधक प्रतिभाताई पवार कॉलेजच्या प्राचार्य पल्लवी जाधव सर्व महाविद्यालयाचे शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी यांनी आपला सहभाग नोंदविला.
पदयात्रे मध्ये वेगवेगळ्या घोषणा देण्यात आल्या. पदयात्रे नंतर महाविद्यालयाच्या प्रांगणात उभे राहून संविधाना वरती प्रतिज्ञा घेण्यात आली. त्यानंतर शिवा ट्रस्ट चे संचालक दिलीपदादा पवार यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर व गौतम बुद्ध यांच्या मूर्तीस व प्रतिमेस हार घालून पूजन करण्यात आले. व तसेच त्यांनी महामानवाच्या योगदाना बद्दल, संविधाना बद्दल व महामानवाच्या कार्या बद्दल शिक्षकांना व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शिका, संघटीत व्हा, व संघर्ष करा हा बाबासाहेबांचा महामंत्राचा उल्लेख केला.
सदर कार्यक्रम शरदचंद्रजी पवार होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलचे प्राचार्य डॉ रिजवान अहमद यांच्या नेतृत्वाखाली पार पडला. सदर कार्यक्रमात डॉ हरिश्चंद्रे बापूसाहेब डॉ जेठलीया विपीन, डॉ पगिरे संगीता डॉ स्वाती खोबरेकर, डॉ विद्या दहे, डॉ दर्शनी साबळे, डॉ जावळे, डॉ भगीरथ जाधव, डॉ प्रतिमा सोनवणे, डॉ आशिष जैस्वाल, डॉ अनिता आगळे, डॉ पौर्णिमा कळमकर, डॉ अभय पानसंबळ, डॉ विजय पवार, डॉ रियाज पटेल, डॉ कळमकर प्रदीप, डॉ प्राची आंबेकर, डॉ रेखा पारखे, डॉ सारिका घेरडे, डॉ सूरज थोरात, डॉ शुभांगी केदार, डॉ महेश कोकाटे, डॉ मुनझ्झा शेख, डॉ पियुष आचलिया, डॉ समर रणसिंग, डॉ दीप्ती गाडेकर, डॉ हीना जातु, डॉ मीनाक्षी शिंगवी, डॉ अमोल म्हस्के डॉ लता सगळगिळे, डॉ प्राजक्ता नागर, इत्यादी उपस्थित होते.