सौ के एस के महाविद्यालयात मधुमेह, रक्तदाब वस्थूलता तपासणी शिबीर संपन्न
बीड : येथील सौ केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर ऊर्फ काकू कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात जागतिक महिला दिन साजरा करण्याच्या निमित्ताने प्रसिध्द डॉ. संजीवनी कोटेचा यांचे मधुमेह, रक्तदाब व स्थूलता तपासणी शिबीराचे नवगण शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्ष डॉ. दीपा क्षीरसागर यांच्या प्रेरणेने आयोजन करण्यात आले होते. या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवानंद क्षीरसागर होते. तसेच प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. संजीवनी कोटेचा यांचे आरोग्य या विषयावर व्याख्यान संपन्न झाले.
या प्रसंगी डॉ. संजीवनी कोटेचा म्हणाल्या की,आपण स्वतः निरोगी असू तर आपण जिथे काम करतो त्या संस्थेला, कार्यालयाला सुध्दा ते निश्चित उपयोगी ठरते. स्वतःसाठी वेळ काढणे, चांगली जीवनशैली स्वीकारणे, नियमित व्यायाम, योग्य आहार व व्यसनापासून दूर राहणे यामुळे तुम्ही स्वतः संपूर्ण निरोगी राहू शकता.एकाने जर समाजात ही सवय अंगीकारली तर तुम्ही तुमच्या आजू बाजूच्या समाजात, नातेवाईकांत आदर्श बनता व त्यांना सुध्दा तुमच्या प्रमाणे निरोगी राहण्याचा संदेश अप्रत्यक्षरीत्या देता ही समाजासाठी खूप महत्वाची गोष्ट ठरते. त्याचप्रमाणे रक्तदाब, मधुमेह व स्थूलत्व तपासणी ही दरवर्षी सर्व निरोगी व्यक्तींनी सुध्दा केली पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.
अध्यक्षपदावरून बोलताना प्राचार्य डॉ. शिवानंद क्षीरसागर यांनी आजच्या काळातील स्त्रियांचे जागतिकस्थान स्पष्ट केले. तसेच जागतिक महिला दिनाचा इतिहास त्यांनी आपल्या भाषणात सांगितला. तसेच बीड जिल्हयाच्यसा बाबतीतमध्ये विचार करताना बीड जिल्हयाच्या कर्तृत्ववान महिला माजी खा. केशरबाई क्षाीरसागर यांचे नाव महाविद्यालयाला दिलेले असून त्यानंतर त्यांचा वारसा संस्था उपाध्यक्ष डॉ. दीपा क्षीरसागर या चालवत आहेत. आणि महाविद्यालयाच्या प्रगतीची घोडदौड चालू आहे. महाविद्यालयातर्फे रोज सकाळी योगा क्लास सुरू आहे. याचा फायदा सर्व महिलांनी घ्यावा अशा सूचना केली. महाविद्यालयात नेहमीच महिलांना प्राधान्य दिले जाते त्याचप्रमाणे महाविद्यालयातील महिला कर्मचारी सुध्दा सर्व शैक्षणिक व इतर कामकाजात सक्षम आहेत असे उपस्थितांना सांगीतले. त्याचप्रमाणे सर्वांना जागतीक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी पदव्युत्तर विभाग प्रमुख डॉ. सतीश माऊलगे, कमवि उपप्राचार्य डॉ.नारायण काकडे, पर्यवेक्षक जालिंदर कोळेकर यांची उपस्थिती होती. या प्रशिक्षण शिबीराचा चाळीस जणांनी लाभ घेतला तर तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन लाभले.
या प्रसंगी महिला कक्ष प्रमुख डॉ. माया खांदाट व हेल्थ केअर युनिट प्रमुख डॉ. अनिता शिंदे, डॉ. संध्या जोगदंड, डॉ. अनिता वैद्य, प्रा. अर्चना चवरे, प्रा. सिध्दीकी, पार्वती नाईकवाडे यांनी परिश्रम घेतले.