सौ के एस के महाविद्यालयात गुरूपोर्णिमा निमित्त भक्तीगायन कार्यक्रम संपन्न
बीड : नवगण शिक्षण संस्थेचे सौै केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर उर्फ काकू कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील संगीत विभागाच्या वतीने गुरूपोर्णिमे भक्तीगीत गायन कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शिवानंद क्षीरसागर यांच्या उपस्थितीत संपन्न झााला.
यावेळी संगीत विभागातील विद्यार्थ्यांनी भक्तीगीत गायन, तबला सोलो वादन, मृदंग वादन, हार्मोनियम वादन आदींचे सादरीकरण करण्यात आले. यात महाविद्यालयातील अश्विनी कोकाटे,अनुपमा कोकाटे, सिद्वेश्वरी कोकाटे, रिया देवडे, प्रेमसागर गायकवाड, अविष्कार क्षीरसागर आदी विद्यार्थ्यांनी भक्तीगीते सादर केली. कार्यक्रमास साथसंगत तबलावादन अश्विनी कोकाटे, मृदंग वादन अविष्कार क्षीरसागर सादर केली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संगीत विभाग प्रमुख डॉ सुरेखा जोशी, प्रा दीपक जमधाडे, प्रा सुरेश थोरात, प्रा इंद्रजीत भांगे आदीनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शिवानंद क्षीरसागर, उपप्राचार्य डॉ संजय पाटील देवळाणकर, डॉ सुधाकर गुट्टे, डॉ विश्वांभर देशमाने, पदव्युत्तर विभाग प्रमुख डॉ ए एस खान, कमवि उपप्राचार्य काकडे एन आर व पर्यवेक्षक जालिंदर कोळेकर आदीसह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.