अमरावती विद्यापीठात ‘भारतीय संविधान आणि आंबेडकरी सौंदर्यशास्त्र’ विषयावर व्याख्यान संपन्न
भारतीय संविधान सौंदर्यशास्त्राचा विचारगाभा – डॉ. शैलेंद्र लेंडे
अमरावती : भारतीय संविधान हे खरे तर सौंदर्यशास्त्राचा विचारगाभा आहे, अशा आशयाचे प्रतिपादन डॉ. शैलेंद्र लेंडे यांनी केले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील डॉ. आंबेडकर अभ्यास केंद्राच्यावतीने गोविंदजी खोब्राागडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित ‘भारतीय संविधान आणि आंबेडकरी सौंदर्यशास्त्र’ विषयावर व्याख्यान देतांना ते बोलत होते. विचारपीठावर अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते, प्रमुख अतिथी म्हणून कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, दानदात्यांचे प्रतिनिधी डॉ. बी.जी. खोब्राागडे, अभ्यास केंद्राचे समन्वयक डॉ. संतोष बनसोड उपस्थित होते. डॉ. लेंडे विषयाची मांडणी करतांना म्हणाले, संविधान एक दस्तावेज आहे. आंबेडकरी सौंदर्यशास्त्रात स्वत:ची जाणीव असते. आंबेडकरी साहित्याची निर्मिती हा आंबेडकरी सौंदर्यशास्त्राचाच भाग आहे. जीवनातील कौरुप्य दूर झाले, तर आंबेडकरी सौंदर्यशास्त्र होईल.
भारताची जडणघडण करणारा मसीहा डॉ. बाबासाहेब आंबेडकर होय -कुलगुरू
अध्यक्षीय भाषण करतांना कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ ही सुवर्णमयी राहिलेली आहे. त्यांच्या मानवमुक्तीच्या लढ¬ाला अनन्यसाधारण महत्व आहे. सर्वांनी त्यांची विचारसरणी अंगीकारावी. भारताची जडणघडण करणारा मसीहा म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत.
मेणबत्ती प्रज्वलन व संत गाडगे बाबा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन, पुष्पार्पण करुन विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सूत्रसंचालन डॉ. देवलाल आठवले, तर आभार डॉ. रत्नशील खोब्राागडे यांनी मानले. व्याख्यान कार्यक्रमाला विद्यापीठातील सर्व शैक्षणिक व प्रशासकीय विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी, विद्यापीठ अधिसभा सदस्य, व्यवस्थापन परिषद सदस्य, अमरावती शहरातील गणमान्य नागरिक, विद्यार्थी मोठ¬ा संख्येने उपस्थित होते.