डेक्कन कॉलेजमध्ये जगद्गुरु श्री शंकराचार्यांच्या दर्शनावर आधारीत व्याख्यानमालेचे आयोजन
पुणे : डेक्कन कॉलेज पदव्युत्तर व संशोधन संस्था, अभिमत विद्यापीठाच्या संस्कृत आणि कोशशास्त्र विभागाच्यावतीने यावर्षी भारतीय भाषा समिती, शिक्षा मंत्रालय, भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने जगद्गुरु श्री शंकराचार्यांच्या दर्शनावर आधारीत व्याख्यानआयोजित करण्याचे ठरविले आहे. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान डेक्कन कॉलेजचे कुलगुरू प्रा प्रमोद पांडे भूषविणार आहेत.
सदर व्याख्यानाची वेळ शनिवार, 23 मार्च 2024 रोजी सकाळी 11:00 अशी असून प्रा मधुसूदन पेन्ना यांचे ‘जगद्गुरु श्री शंकराचार्यांच्या दर्शनातील एकात्मता’या विषयावरील व्याख्यान व त्यानंतर आचार्यांच्या दर्शनावर परिसंवाद आयोजित केलाआहे. तसेच भोजनोत्तर सत्रात जगद्गुरु आदि शंकराचार्य हा संस्कृत चित्रपट दाखविण्यात येणार आहे.
तसेच या कार्यक्रमानंतर सहभागींना प्रमाणपत्र देण्यात येईल. हा कार्यक्रम निःशुल्क असून सर्व वयोगटासाठी खुला ठेवण्यात आला आहे. सदर कार्यक्रमाच्या स्थानिक समन्वयिका डॉ वृषाली भोसले, सहयोगी प्राध्यापक व डॉ भावना बालटे, संपादकीय सहाय्यक, संस्कृत शब्दकोश प्रकल्प, डेक्कन कॉलेज, पुणे या असून सुधाकर उपाध्याय, राष्ट्रीय समन्वय, भारतीय भाषा समिती, भारत सरकार हे आहेत.