स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे महाराष्ट्र शासनाकडून अभिनंदन
नांदेड : केंद्र शासनाच्या निर्देशानुसार महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठे व राष्ट्रीय सेवा योजना राबविणाऱ्या सर्व संलग्नित महाविद्यालयांमध्ये सन २०२२-२३ पासून पी एफ एम एस प्रणाली नव्याने राबविण्यात आली. या नवीन प्रणालीमध्ये महाराष्ट्र शासनास ‘उपयोगिता प्रमाणपत्र’ सादर करणारे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ हे महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ ठरले. त्यामुळे राज्य संपर्क अधिकारी डॉ निलेश पाठक, महाराष्ट्र शासन यांनी पत्राद्वारे विद्यापीठाचे अभिनंदन आणि कौतुक केले आहे.
या प्रणाली अंतर्गत सर्व विद्यापीठे व महाविद्यालयामध्ये नवीन झिरो बॅलन्स सबसिडीअरी अकाउंट (ZBSA) एस बी आय बँकेमध्ये करंट खाते काढण्यात आले. परंतु सर्वांनाच नवीन ZBSA करंट खाते उघडणे, विद्यापीठ व शासनाकडून मॅपिंग करून घेणे, डेटा ऑपरेटर, डेटा अप्रुव्हर, एक्सपेंडिचर आणि इलेक्ट्रॉनिक प्रिंट पेमेंट ॲडव्हाइस जनरेट करणे हे सर्व विद्यापीठातील संचालक, संलग्नित महाविद्यालयातील प्राचार्य व कार्यक्रमाधिकारी यांच्यासाठी एक नवीन आव्हानच होते.
शासनाच्या निर्देशानुसार पी एफ एम एस प्रणाली मार्फतच राष्ट्रीय सेवा योजनेचे अनुदान प्राप्त होणार होते. राष्ट्रीय सेवा योजनेचे कोणतेही युनिट अनुदानापासून वंचित राहू नये यासाठी सुरुवातीपासूनच म्हणजे जानेवारी २०२३ पासून सातत्याने पाठपुरावा करत तसेच येणाऱ्या अडचणींना सामोरे जात, सर्वांना वेळेत अनुदान प्राप्त करण्यात यश आले. सर्वांच्या सहकार्याने राष्ट्रीय सेवा योजनेचे केंद्रीय पद्धतीद्वारे जिल्हा स्तरावर अंकेक्षण करून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने ‘उपयोगिता प्रमाणपत्र’ महाराष्ट्र शासनास सादर केले.
याबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मनोहर चासकर, कुलसचिव डॉ शशिकांत ढवळे, वित्त व लेखा अधिकारी महमद शकील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ दिगंबर नेटके, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ सूर्यप्रकाश जाधव, क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ मनोज रेड्डी, सहा. उपकुलसचिव रामदास पेदेवाड यांनी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ मल्लिकार्जुन करजगी, लेखा अधिक्षक श्याम डाकोरे, सहा लेखा अधिक्षक सुनिल ढाले, सर्व प्राचार्य व कार्यक्रम अधिकारी यांचे अभिनंदन केले.