‘स्वारातीम’ विद्यापीठातील जैवशास्त्र संकुलामध्ये प्रवेश पूर्व परीक्षेचे आयोजन

नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील जैवशास्त्र संकुलामध्ये चालणाऱ्या एम एस्सी बायोटेक्नॉलॉजी, एम एस्सी मायक्रोबायोलॉजी, एम एस्सी बॉटनी, एम एस्सी झूलॉजी आणि पीजीडीएमएलटी या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता प्रवेश पूर्व (सीईटी) परिक्षचे आयोजन दि १८ व १९ मे दरम्यान करण्यात आले आहे. या करिता प्रवेश पूर्व परिक्षेचे अर्ज जैवशास्त्र संकुलामध्ये स्वीकारणे चालू आहे.

Advertisement
SRTMUN-Nalanda-Gate-2

या पूर्व परीक्षेसाठी बी एस्सी तृतीय वर्षाची परीक्षा दिलेले (अॅपियर) विद्यार्थी तसेच बी एस्सी उत्तीर्ण विद्यार्थी पात्र ठरणार आहेत. प्रवेश पूर्व परीक्षा झाल्यानंतर निकाल व यासंबंधीत इतर सूचना या विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रकाशित केल्या जातील.

अधिक माहितीसाठी विद्यापीठाच्या www.srtmun.ac.in या संकेतस्थळावर व जैवशास्त्र संकुलाच्या कार्यालयामध्ये संपर्क साधावा, या अभ्यासक्रमासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश पूर्व परिक्षेसाठी अर्ज करावेत, असे आवाहन जैवशास्त्र संकुलाचे संचालक डॉ शिवाजी चव्हाण यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page