मुक्त विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी

नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी मुक्त विद्यापीठाचे कुलसचिव दिलीप भरड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

याप्रसंगी कुलसचिव दिलीप भरड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या उत्तुंग अशा कार्याबद्दल उपस्थितांसमोर आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. नितीन ठोके यांनी केले. तर आभार प्रदर्शन कक्ष अधिकारी गणेश चव्हाण यांनी केले. कार्यक्रमास विद्यापीठाचे अधिकारी, कर्मचारी, तसेच सुरक्षारक्षक उपस्थित होते.


यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. त्याप्रसंगीच्या छायाचित्रात कुलसचिव दिलीप भरड, डॉ. नितीन ठोके, गणेश चव्हाण, आदी कर्मचारी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com