हिंदी विश्वविद्यालयाची शोधार्थी चंद्रकला शाहू यांनी जेएनयू मध्ये शोधनिबंध केला सादर
वर्धा : महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाच्या अनुवाद अध्ययन विभागाची शोधार्थी चंद्रकला शाहू हिने ‘मातृभाषेतून शिक्षण संशोधन आणि संकल्पनात्मक क्षमतेचा मूलभूत आधार’ या विषयावर आपला शोधनिबंध सादर केला.
भारतीय भाषा केंद्र, भाषा साहित्य आणि सांस्कृतिक अध्ययन संस्था, जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय, नवी दिल्ली व भारतीय सामाजिक विज्ञान अनुसंधान परिषद नवी दिल्ली आणि मैथिली-भोजपुरी अकादमी, दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने २१ व २२ फेब्रुवारी रोजी ‘मातृभाषेतून व्यक्त होणारी भाषा, साहित्य आणि संस्कृतीचे विविध आयाम’ या विषयावर आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. यावेळी त्यांनी बहुभाषिक कवी संमेलनात मराठी भाषेतील ‘माझी मराठी, योग वारसा’ ही कविताही सादर केली.