अमरावती विद्यापीठाची ‘आर्टीफिशियल इंटेलिजन्स’ विषयाची परीक्षा २८ जून ला
विद्यार्थ्यांनी नोंद घेण्याचे विद्यापीठाचे आवाहन
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची उन्हाळी-2024 ची एम एस्सी (अप्लाईड इलेक्ट्रॉनिक्स) (सी बी सी एस नवीन) सत्र – ४ या अभ्यासक्रमातील ‘आर्टीफिशियल इंटेलिजन्स’ या विषयाची परीक्षा यापूर्वीच्याच परीक्षा केंद्रांवर दि २८ जून, २०२४ रोजी दुपारी ०२:०० ते ०५:०० या वेळेत घेण्यात येणार आहे.
यासंदर्भात विद्यापीठाच्या उपयोजित परमाणू विद्युत विभाग तसेच सर्वसंबंधित महाविद्यालये, परीक्षा केंद्रांना कळविण्यात आले असून विद्यार्थ्यांना याबाबत महाविद्यालयांनी तातडीने अवगत करावे व काही अडचण असल्यास परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ नितीन कोळी यांना ९८५००४२३५७ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे विद्यापीठाच्या वतीने कळविण्यात येत आहे.