महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया यांचा ’अॅकेडमिक डायलॉग’ कार्यक्रमाचे उद्घाटन

आंतरराष्ट्रीय स्तरावर आरोग्य विद्यापीठाचा लौकिक – आरोग्य मंत्री अंबर-जेड सॅन्डरसन वेस्टर्न ऑस्ट्रेलिया

नाशिक : आरोग्य विज्ञान विद्यापीठाने आरोग्य शिक्षण क्षेत्रात महत्वपूर्ण कामगिरी केली असून ऑस्ट्रेलियन विद्यापीठासमवेत अनेक विविध प्रकारचे उपक्रम राबविले जाणार असल्याचे प्रतिपादन असल्याने विद्यापीठाच्या वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या आरोग्य मंत्री अंबर-जेड सॅन्डरसन यांनी केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया यांचा ’अॅकेडमिक डायलॉग’ या दोन दिवसीय कार्यक्रमाचे विद्यापीठात आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभात अध्यक्षस्थानी वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या आरोग्य मंत्री अंबर-जेड सॅन्डरसन समवेत व्यासपीठावर विद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) प.वि.से.प., अ.वि.से.प., वि.से.प., अतिथी म्हणून वेस्टर्न मेडिकल ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. पॅडी रामनाथन, प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ आदी मान्यवर उपस्थित होते.

वेस्टर्न ऑस्टेªेलियाच्या आरोग्य मंत्री अंबर-जेड सॅन्डरसन यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, भारतात सुरळीत आरोग्यसेवा देणारी सक्षम यंत्रणा असून त्यासाठी काम करणारे डॉक्टर आणि पॅरामेडिकल कर्मचारी यांचे काम महत्वपूर्ण आहे. आरोग्य शिक्षणात अॅकेडमिक बाबींची  अत्यंत काटेकोर पालन होते त्यावर सेवा व सक्षमता अवलंबून असते. पब्लीक हेल्थ, नर्सिंग व तत्सम विद्याशाखेतील विद्यार्थ्यांना जगभरात मोठया प्रमाणात आरोग्य सेवेसाठी संधी उपलब्ध आहेत त्याचा एक भाग वेस्टर्न ऑस्टेªलिया आरोग्य शिक्षणात घेत आहे. शासकीय आणि खासजी क्षेत्रातील आरोग्यसेवा देणाया संस्था मनुष्यबळासाठी भारताकडे लक्ष आहे. तरुण आरोग्य शिक्षणातील विद्यार्थ्यांना त्याचा उपयोग करुन घ्यावा. वेस्टर्न ऑस्टेªलियामध्ये आपणांस यासाठी प्रवेश व अभ्यासक्रम उपलब्ध करुन देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू असे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी सांगितले की, संशोधन आणि आरोग्य शिक्षणाच्या कक्षा रुंदावणे गरजेचे आहे. या दृष्टीकोनातून विद्यापीठाने विविध परदेशी आरोग्य विद्यापीठ व संस्थासमवेत सामंजस्य करार करण्यात येणार आहेत. केंद्र शासनाच्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसी धोरणानुसार आरोग्य शिक्षणाच्या विद्यार्थ्यांना अन्य देशात आरोग्य सेवेच्या संधी मोठया प्रमाणात उपलब्ध होऊ शकतात त्यासाठी परदेशी विद्यापीठासमवेत करार केल्यास आरोग्य शिक्षणातील विद्यार्थी शिक्षण, प्रशिक्षण व आरोग्य सेवा देऊ शकतील. यासाठी आपल्या देशात मोठया प्रमाणात तरुण युवक आहेत त्यांना शिक्षणाचे व्यासपीठ उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. वैद्यकीय विद्याशाखेच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम, नर्सिंग विद्याशाखेचे पदवी व पदविका अभ्याक्रम यासाठी मोठया प्रमाणात मनुष्यबळाची गरज असते. याकरीता पथदर्शी उपक्रम राबवून वेस्टर्न ऑस्टेलिया समवेत करार करण्यात येणार आहेत त्याचा विद्यार्थ्यांना लाभ होईल असे त्यंानी संागितले.

Advertisement

वेस्टर्न मेडिकल ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. पॅडी रामनाथन यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, आरोग्य विद्यापीठाचे शिक्षण क्षेत्रातील काम उल्लेखनीय आहे. शोध आणि संशोधन याकरीता प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे. आरोग्य क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर मोठया प्रमाणात करण्यात येतो, यासाठी पॅरामेडिकल  कोर्सेस महत्वपूर्ण आहेत. आरोग्य विद्यापीठ व वेस्टर्न ऑस्टेªलिया यांच्या सामंजस्याने अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. विद्यार्थ्यांना आरोग्य शिक्षणात संशोधनासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यात येईल. वेस्टर्न ऑस्टेªलियात भारतीय विद्यार्थ्यांना सुपरस्पेशालिटी करीता संसाधने उपलब्ध करुन देण्यात येतील. आरोग्य सेवेच्या कक्षा रुंदावणे महत्वपूर्ण आहे त्यासाठी आरोग्य विद्यापीठाने घेतलेला पुढाकार कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी विद्यापीठाच्या विविध उपक्रमांविषयी सादरीकरणाव्दारे माहिती दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी केले. उपस्थित मान्यवरांचे आभार विद्यापीठाच्या इंटरनॅशनल एज्युकेशन हबचे समन्वयक संदीप राठोड यांनी केले. या कार्यक्रमास शैक्षणिक विभागाच्या अधिष्ठाता डॉ. मृणाल पाटील, उपकुलसचिव डॉ. सुनील फुगारे व  विद्यापीठाचे अधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.


        या कार्यक्रमास वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचे चिफ अलाईड ऑफिसर श्रीमती जेनिफर एॅन कॅम्पबेल, एक्झ्ाीकेटीव्ह डायरेक्टर पीपल अॅड कल्चरलचे श्री. चार्लस् ओ-हॅनलॉन, डॉ. भास्कर मॅनडल, एक्झ्ाीकेटीव्ह डिन फॅकल्टी ऑफ मेडिसिनचे प्रा. रथन सुब्रमन्यम्, वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचे स्टेट मॅनेजर डॉ. शेन पारतिक केली, चिफ एक्झ्ाीकेटीव्ह ऑफिसर श्रीमती टिना मॉली चिनेरी, वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचे स्टेट मॅनेजर श्रीमती जॉडी होलब्रोक, स्कुल ऑफ नर्सिंगच्य एक्झ्ाीकेटीव्ह डिन प्रा. कॅनेन स्टिकलॅन्ड, स्कुल ऑफ नर्सिंगच्या हेड प्रा. ट्रॅसी मोरोनी, फॅकल्टी ऑफ हेल्थ सायन्सच्या डिन प्रा. जया दंनतास, इनव्हेसमेंट अॅड ट्रेड कमिशनर श्रीमती नशिद चौधरी, संचालक श्रीमती क्लेना जेम्स, बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर श्री. एटॉनी जोसेफ, श्री. हितेंद्र गांधी, ऑफिस मॅनेजर श्रीमती उथ्रा सुब्रमन्यम् आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम उपरांत वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचे अतिथींनी विद्यापीठाचा ग्रीन कॅम्पस, प्रकृती वेलनेस सेंटर, दृष्टी संशोधन कें्रदास भेट दिली तसेच विद्यापीठाच्या विविध उपक्रमांबद्दल जाणून घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page