अभाविप पुणे महानगरचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ठिय्या आंदोलन

सुस्त आणी मुजोर परीक्षा विभागा विरोधात आंदोलन

पुणे विद्यापीठ फोटोकॉपी व पुनर्मूल्यांकन समस्या

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा होऊन निकाल लागल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी फोटोकॉपी साठी अर्ज केला होता त्यांना दीड महिना उलटून गेल्यानंतर सुध्दा फोटोकॉपी मिळालेली नाही. फोटोकॉपीच हातात न मिळाल्यामुळे पुनर्मूल्यांकनासाठी विद्यार्थ्यांना अर्ज करता आलेला नाही आणि पुढच्या परीक्षेचा अर्ज भरण्याची मुदत संपली आहे.

Advertisement

सुस्त कारभार आणि मुजोर प्रशासना मुळे सर्वसामान्य विद्यार्थ्यांचे आर्थिक व शैक्षणिक नुकसान झाले आहे याच विरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पुणे महानगरच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page