हिंदी विश्वविद्यालयात ‘खेलेगा युवा, जीतेगा भारत’ विषयावर व्याख्यान संपन्न
भारतीय खेळांना आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मान मिळावा – प्रदीप शेखावत
वर्धा : महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयात शुक्रवार, १२ जुलै रोजी महादेवी वर्मा सभागृहात शारीरिक शिक्षण व क्रीडा विषयक गतिविधींना चालना देण्यासाठी शारीरिक शिक्षण व क्रीडा समितीच्या वतीने ‘खेलेगा युवा, जीतेगा भारत’ विषयावर आयोजित व्याख्यानात खेलो भारत कार्यक्रमाचे राष्ट्रीय प्रमुख प्रदीप शेखावत म्हणाले की खेलो इंडियात भारतीय व पारंपरिक खेळांना प्रोत्साहन देण्यात येत असून या खेळांना आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मान मिळावा म्हणून भारत सरकार प्रयास करत आहे.
कबड्डी, खो खो, तीरंदाजी, कुश्ती, मल्लखंब या खेळांना प्रोत्साहित करण्यासाठी शाळा, महाविद्यालये व विद्यापीठातील विद्यार्थ्यांना जोडले जात आहे. भारतीय खेळाडूंनी हाॅकी, कुश्ती, कबड्डी, बॅडमिंटन व क्रिकेट या खेळांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे असे सांगून ते म्हणाले की राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात खेळांना महत्त्व देण्यात आले आहे, प्रत्येक विद्यार्थी कोणत्या ना कोणत्या खेळात अवश्य शामिल व्हावा हा उद्देश आहे. रशिया सोबत झालेल्या करारानुसार खेळाडूंना स्काॅलरशिपही दिली जात आहे. भारतात २०३६ ऑलम्पिक खेळ होणार असून त्याची तयारी आतापासूनच सुरू करावी, असेही ते म्हणाले.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू प्रो कृष्ण कुमार सिंह म्हणाले की विश्वविद्यालयात खेळांना चालना दिली जात आहे. खेळाडूंना चांगले वातावरण व सुविधा उपलब्ध आहेत.
शारीरिक शिक्षण व क्रीडा समितीचे अध्यक्ष कुलसचिव प्रो आनन्द पाटील म्हणाले, खेळांच्या अभावामुळे शारीरिक समस्या वाढत चालल्या आहेत. विद्यार्थ्यांनी उपलब्ध सुविधांचा लाभ घेऊन खेळत राहावे असे ते म्हणाले.
शारीरिक शिक्षण व क्रीडा समितीचे उपाध्यक्ष डॉ अनिकेत अनिल आंबेकर हे कार्यक्रमाचे संयोजक होते. कार्यक्रमाचे संचालन सहायक प्रो डॉ सीमा बर्गट यांनी केले तर एसोशिएट प्रो डॉ बालाजी चिरडे यांनी आभार मानले. कार्यक्रमांची सुरुवात कुलगीताने तर समारोप राष्ट्रगीताने झाला. यावेळी अध्यापक, शोधार्थी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.