राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ पदव्युत्तर शारीरिक शिक्षण विभाग व विज्ञान संस्था यांचा संयुक्त उपक्रम
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा पदव्युत्तर शारीरिक शिक्षण विभाग आणि विज्ञान संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय क्रीडा दिवस गुरुवार, दिनांक २९ ऑगस्ट २०२४ रोजी उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाला संस्थेचे संचालक डॉ जयराम खोब्रागडे अध्यक्षस्थानी होते तर वरिष्ठ क्रीडा पत्रकार नरेश शेळके, डॉ सी पी चौधरी, के जी पाटील यांची विशेष अतिथी म्हणून उपस्थिती होती. पदव्युत्तर शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ माधवी मार्डीकर यांनी खेळाचे महत्व तसेच प्रमुख अतिथींची ओळख करून दिली. वरिष्ठ क्रीडा पत्रकार नरेश शेळके यांनी मेजर ध्यानचंद यांच्या जीवनावर, खेळावरती प्रकाश टाकला. विद्यार्थ्यांना त्यांच्या विषयी विविध वेगवेगळी प्रकारची माहिती सांगितली. त्याचप्रमाणे नुकत्याच झालेल्या ऑलिंपिकचे विश्लेषण केले.
संचालन कुमारी सूची हिने केले तर आभार हर्षल ने मानले. बुद्धिबळ, टेबल टेनिस, एथलेटिक्सचे विविध प्रकार टग ऑफ वार असे विविध खेळ विद्यार्थ्यांसाठी आयोजित केले होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वृषाली देशमुख, सुनील कापगते, रोशनी खोब्रागडे, भास्कर अतकरे, जस्सी सिंग यांनी सहकार्य केले.