शरद पवार दंत महाविद्यालयातील विद्यार्थिनी नंदिनी ठकरानी हिला पियर फाऊचार्ड विद्यार्थी पुरस्कार जाहीर

वर्धा : दत्ता मेघे उच्च शिक्षण आणि संशोधन संस्था अभिमत विद्यापीठ संचालित सावंगी येथील शरद पवार दंत महाविद्यालयातील विद्यार्थिनी नंदिनी ठकरानी हिला अत्यंत प्रतिष्ठेचा पियर फाऊचार्ड अकादमी आंतरराष्ट्रीय वरिष्ठ विद्यार्थी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे भारतातून दरवर्षी केवळ १५ विद्यार्थ्यांची या पुरस्कारासाठी निवड केली जात असून सलग पाचव्या वर्षीही शरद पवार दंत महाविद्यालयातील विद्यार्थ्याला हा पुरस्कार प्राप्त होतो आहे.

Advertisement
नंदिनी ठकरानी, पियर फाऊचार्ड विद्यार्थी पुरस्कार विजेती

दंतचिकित्सा शाखेत शैक्षणिक आणि वैद्यकीय चिकित्सा या दोन्ही कार्यक्षेत्रासोबतच सांस्कृतिक, सामाजिक आणि क्रीडा याही क्षेत्रात वर्षभर सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या पदवी अभ्यासक्रमातील विद्यार्थ्याला पियर फाऊचार्ड अकादमीद्वारे या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. अधिक कौशल्यपूर्ण कार्य आणि त्या कार्यासाठी समर्पणाची भावना ही ओळख नंदिनी ठकरानी हिने निर्माण केली असून तिला आंतरराष्ट्रीय पीएफए प्रमाणपत्र सन्मान जाहीर झाल्याबद्दल कुलगुरू डॉ ललितभूषण वाघमारे, कुलसचिव डॉ श्वेता काळे पिसूळकर, महासंचालक डॉ राजीव बोरले, दंत महाविद्यालयाच्या संचालक मनीषा मेघे, संचालक डॉ तृप्ती वाघमारे, अधिष्ठाता डॉ मनोज चांडक, शैक्षणिक अधिष्ठाता डॉ विद्या लोहे, उपअधिष्ठाता डॉ अलका हांडे, मुख्य दंतवैद्यकीय अधीक्षक डॉ अंजली बोरले यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page