उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे विद्यार्थी जपान येथे समर स्कूल प्रशिक्षणात सहभागी
सामंजस्य करारातंर्गत तीन विद्यार्थी तोकुशिमा विद्यापीठात १५ दिवसांचे प्रशिक्षण
जळगाव : तोकुशिमा विद्यापीठ, जपान आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्यात झालेल्या सामंजस्य करारातंर्गत तीन विद्यार्थी जपान येथे १५ दिवसांच्या समर स्कूल प्रशिक्षणात सहभागी झाले आहेत.
विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र प्रशाळेतील विद्यार्थी मिलन सोनवणे तसेच विद्यार्थिनी लेखमाला इंगळे व केतकी चौधरी हे तिघे २२ जुलै ते ७ ऑगस्ट या कालावधीत तोकुशिमा विद्यापीठ, जपान येथे होत असलेल्या समर स्कूल मध्ये सहभागी झाले आहेत. या विद्यार्थ्यांना फेलोशिप देखील दिली जाणार आहे.
कुलगुरु प्रा व्ही एल माहेश्वरी तसेच प्रशाळेतील सर्व प्राध्यापकांनी सहभागी झालेल्या या तीन विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्यात.