सौ के एस के महाविद्यालयात छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी
बीड : सौ केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर ऊर्फ काकू कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरी करण्यात आली. या वेळी महाविद्यालयाचे प्रााचार्य डॉ शिवानंद क्षीरसागर यांच्या हस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांमुळे पुरोगामी महाराष्ट्राची ओळख असून छत्रपती शाहू महाराज आरक्षणाचे जनक असून कमजोर माणसाला ताकद देण्याचे काम त्यांनी केले आहे. शिक्षण, वस्तीगृह, खेळ, जातीयव्यवस्था निर्मुलन, समाज जागृती यासारखी महान कार्य त्यांनी केले आहे असे विचार त्यांनी व्यक्त केले. लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या विचाराने बहुजन समाजातील विद्यार्थी, विद्यार्थिंनींना परिवर्तनवादी विचार प्रवाहात सामावून घेण्यासाठी सातत्याने प्रयत्न करते असे विचार व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ बळीराम राख यांनी केले. तर प्रास्ताविक डॉ अनिता शिंदे आणि आभार प्रदर्शन डॉ पांडूरंग सुतार यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी उपप्राचार्य डॉ संजय पाटील देवळाणकर, कमवि उपप्राचार्य डॉ नारायण काकडे, पर्यवेक्षक प्रा जालींदर कोळेकर, डॉ सुधाकर गुट्टे, कार्यालयीन अधिक्षक डॉ विश्वांभर देशमाने आदीसह महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.