वार्षिकांक स्पर्धेतील विजेत्या महाविद्यालयांचा संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात सत्कार
स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र देऊन कुलगुरूंनी केला गौरव
अमरावती : वार्षिकांक स्पर्धा 2022-23 मध्ये विजेता ठरलेल्या महाविद्यालयांना गौरवान्वित करण्यात आले. महाराष्ट्र दिनी 1 मे, 2024 रोजी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील दृकश्राव्य सभागृहात या समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. समारंभाला विद्यापीठाचे कुलसचिव डॉ तुषार देशमुख यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. समारंभात विजेत्या महाविद्यालयांना कुलगुरू डॉ मिलींद बारहाते यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
अ) शहरी विभाग : बिगर व्यावसायिक गटात
क्रियेशन स्पर्धेत श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावती प्रथम पारितोषिकाचे मानकरी ठरले. तर भारतीय महाविद्यालय, अमरावती ला भारती स्पर्धेत द्वितीय, अक्षरवेल स्पर्धेत विनायक विद्या मंदीर महाविद्यालय, अमरावती हे तृतीय पारितोषिकाचे मानकरी ठरले. कुलुगुरू डॉ मिलींद बारहाते यांनी स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन महाविद्यालयांचा गौरव केला.
ब) ग्रामीण विभाग : बिगर व्यावसायिक गटात
फुलोर स्पर्धेत गो सी टोम्पे महाविद्यालय, चांदुरबाजार प्रथम पारितोषिकाचे मानकरी ठरले, तर कदंबिनी स्पर्धेत इंदिरा महाविद्यालय, कळंब, जि यवतमाळ हे व्दितीय, कल्पना या वार्षिकांक स्पर्धेत फुलसिंग नाईक महाविद्यालय, पुसद, जि यवतमाळ हे तृतीय पारितोषिकाचे मानकरी ठरले.
क) शहरी व ग्रामीण विभाग : व्यावसायिक गटात
टेक्नो रिदम वार्षिकांक स्पर्धेत डॉ राजेंद्र गोडे इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी अॅन्ड रिसर्च, अमरावती प्रथम पारितोषिकाचे मानकरी ठरले. तर अॅस्पायर-2023 या वार्षिकांक स्पर्धेत प्रो राम मेघे इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी अॅन्ड रिसर्च, बडनेरा व्दितीय पारितोषिक, इनोव्हेटर-2023 या वार्षिकांक स्पर्धेत सिपना अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, अमरावती हे तृतीय पारितोषिकाचे मानकरी ठरले. कुलगुरू डॉ मिलींद बारहाते यांनी विजेत्या महाविद्यालयांना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव केला. कार्यक्रमाला विद्यापीठाशी संलग्नित पाचही जिल्ह्रांमधील महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक, कर्मचारी तसेच विद्यापीठातील सर्व शैक्षणिक व प्रशासकीय विभागप्रमुख, अधिकारी, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वार्षिकांक स्पर्धा मूल्यांकन समितीचा गौरव
वार्षिकांक स्पर्धेचे मूल्यांकन करणारे प्रा डॉ प्रमोद गारोडे अध्यक्ष, प्रा डॉ भगवान पांडा, डॉ तीर्थराज राय, डॉ संदिप जोशी, डॉ सिराज अनवर खान या सदस्यांचा कुलगुरूंच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.