शिवाजी विद्यापीठात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिन मोठया उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. सकाळी ठीक 8 वाजता प्र-कुलगुरू डॉ प्रमोद पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.
यावेळी कुलसचिव डॉ विलास शिंदे यांच्यासह परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी डॉ सुहासिनी पाटील, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा अधिष्ठाता डॉ श्रीकृष्ण महाजन, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ सरिता ठकार, मानव्यशास्त्र विद्याशाखा अधिष्ठाता डॉ महादेव देशमुख, इनोव्हेशन, इनक्युबेशन व लिंकेजेस केंद्राचे संचालक डॉ सागर डेळेकर, बॅ बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्त्रोत केंद्राचे संचालक डॉ धनंजय सुतार, क्रीडा संचालक डॉ शरद बनसोडे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ प्रकाश गायकवाड, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ तानाजी चौगुले, सुरक्षा अधिकारी वसंत एेकले यांच्यासह विविध अधिविभागांचे प्रमुख, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठया संख्येने उपस्थित होते.
यावेळी संगीत व नाटयशास्त्र अधिविभागाच्या विद्यार्थीनींसह सामूहिक राष्ट्रगीत, राज्यगीत तसेच विद्यापीठ गीत गायन करण्यात आले. प्र-कुलगुरू डॉ पाटील यांच्यासह सर्व मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयास पुष्प वाहून अभिवादन केले. सर्व उपस्थितांना प्र-कुलगुरूंनी महाराष्ट्र दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.