MUHS च्या पद्व्युत्तर पदवी अभ्यासक्रमास अर्ज करण्यासाठी 20 मे पर्यंत मुदत

एमएससी इन फार्मास्युटिकल मेडिसिन, हेल्थ केअर अॅडमिनीस्ट्रेशन व मास्टर्स ऑफ पब्लिक हेल्थ (न्युट्रिशन) पद्व्युत्तर पदवी अभ्यासक्रमास अर्ज करण्यासाठी 20 मे पर्यंत मुदत

नाशिक : विद्यार्थ्यांच्या करियरच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरणारे पद्व्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी सन 2024-25 करीता प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या अभ्यासक्रमांना प्रवेशाकरीता अर्ज करण्यासाठी दि 20 मे 2024 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) पविसेप, अविसेप, विसेप यांनी सांगितले की, आरोग्य क्षेत्रातील विद्यार्थ्यांकरीता करियरच्या दृष्टीने महत्वपुर्ण असणारे तसेच मास्टर ऑफ सायन्स ड्रग सायन्सेस औषधांचा शोध, विकास सुरक्षितता पैलूंच्या क्षेत्रात सैद्धांतिक आणि व्यावहारिक कौशल्ये प्रदान करते.

muhs-logo

हा मास्टर प्रोग्राम औद्योगिक किंवा शैक्षणिक संशोधन, उत्पादन विकास किंवा नियामक एजन्सीमधील करिअरवर केंद्रीत आहे. सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात नव्याने संधी उपलब्ध करुन देण्यासाठी आरोग्य विद्यापीठातर्फे सार्वजनिक आरोग्य पोषणशास्त्र, आरोग्य सेवा व्यवस्थापन व औषध निर्मिती क्षेत्रातील नाविण्यपुर्ण पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरु करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

विद्यापीठाचे प्रति-कुलगुरु डॉ मिलिंद निकुंभ यांनी सांगितले की, मास्टर ऑफ बिजनेस अॅडमिनिस्ट्रेशन अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना हॉस्पिटैलिटी मैनेजमेंट, हेल्थकेअर मैनेजमेंट, फायनान्स मैनेजमेंट, मिडिया मैनेजमेंट, रुरल मैनेजमेंट, मार्केटिंग मैनेजमेंट, इवेंट मैनेजमेंट, डिजिटल मैनेजमेंट, तसेच पोषणविषयक विशिष्ट कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन, व्यवस्थापन, प्रत्यक्ष कृती आणि करण्यात आलेल्या उपक्रमांचे मूल्यमापन अशा सर्व व्यवस्थापकीय कौशल्याचे ज्ञान मिळत असल्याने हा अभ्यासक्रम वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांकरीता अत्यंत महत्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले.

Advertisement

विद्यापीठाचे कुलसचिव डॉ राजेंद्र बंगाळ यांनी सांगितले की, मास्टर इन पब्लीक हेल्थ अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना सार्वजनिक आरोग्य पोषण सायकल आणि माता, बालक तसेच सार्वजनिक आरोग्य चक्रः विशेष परिस्थिती आणि रोगांमध्ये प्रौढ पोषण आणि पोषण संशोधन पद्धती पोषण आरोग्य संप्रेषण आणि प्रचार अन्न आणि पोषण आणि सुरक्षा, अन्न प्रणाली आणि अन्न पर्यावरण अॅडव्हान्स बासोस्टॅटिस्टिक्स सार्वजनिक आरोग्य पोषण आणि अन्न धोरण हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांकरीता अत्यंत महत्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले.

सदर अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरीता आरोग्य विद्यापीठाचे विविध विद्याशाखांचे पदवी, पदविका परीक्षा उत्तीर्ण, बी एस्सी नर्सिंग व अनुषंगिक अभ्यासक्रमाचे पदवीधर प्रवेश घेऊ शकतात, तसेच एम एस्सी फार्मास्युटिकल मेडिसीन अभ्यासक्रमाकरीता आरोग्य विद्यापीठाचे विविध विद्याशाखांचे पदवीधर विद्यार्थी तसेचे बी एस्सी, बी फार्मसी परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी या अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ शकतात.
विद्यापीठाने इच्छुक विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी अंतीम मुदत दि 20 मे 2024 पर्यंत दिली आहे.

या अभ्यासक्रमाकरीता घेण्यात येणाऱ्या केंद्रिय सामायिक परीक्षेबाबतची माहिती विद्यापीठाचे संकेतस्थळ www.muhs.ac.in वर प्रसिध्द केली आहे. याबाबत अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी 0253-2539301 दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. विद्यापीठाचे गुणवत्तापुर्ण शैक्षणिक अभ्यासक्रमांसाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा असे आवाहन विद्यापीठाच्या वतीने करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page