आरोग्य विद्यापीठ व आयआयटी बॉम्बेतर्फे ‘संगम-2024’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन संपन्न

तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर करुन सामाजिक आरोग्य प्रश्न सोडविणे शक्य – लुंईगी डी-एक्वीनो, चिफ ऑफ हेल्थ, युनिसेफ

मुंबई : तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर करुन सामाजिक आरोग्य प्रश्न सोडविणे शक्य असल्याचे प्रतिपादन युनिसेफचे चिफ ऑफ हेल्थ लुंईगी डी-एक्वीनो, आयआयटी यांनी केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ व आयआयटी बॉम्बे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘संगम-2024’ वन हेल्थ या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. या समारंभास युनिसेफचे चिफ ऑफ हेल्थ लुंई डी-एक्वीनो प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. समवेत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त), महाराष्ट्र शासनाच्या अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) सुजाता सौनिक, लोणेरे येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु प्रा कारभारी काळे, आयआयटी बॉम्बेचे उपसंचालक प्रा एस सुदर्शन आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी युनिसेफचे चिफ ऑफ हेल्थ लुंईगी डी-एक्वीनो यांनी सांगितले की, संगम-2024 परिषेदेच्या माध्यमातून समाजात उद्भवाÚया आरोग्य प्रश्नांवर चर्चा होऊन त्याचे निराकरण करण्यासाठी मार्ग सापडतो. बालमृत्यूचे वाढते प्रणाम ही गंभीर बाब असून त्यासाठी उपाययोजना होणे आवश्यक आहे. समाजातील समस्यांच्या सोडवणूकीसाठी शासन व्यवस्था, आरोग्य सेवक आणि आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी एकत्र येऊन सातत्याने विचार विनिमय करणे आवश्यक आहे. अशा स्वरुपाच्या परिषदांची सर्वच क्षेत्रात आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी महाराष्ट्र शासनाच्या अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) सुजाता सौनिक यांनी सांगितले की, हेल्थ केअरच्या अनुषंगाने अधिक कार्य करणे गरजेचे आहे. संगमच्या माध्यमातून आरोग्य आणि तंत्रज्ञान दोन क्षेत्रातील संशोधक, अभ्यासक एकत्र येतात यातून होणारी चर्चा व मार्गदर्शन दिशादर्शक असते. ’संगम’ हे परिषद नसून तो आधारस्तंभ असल्याचे त्यांनी सांगितले. त्या पुढे म्हणाल्या की, लसिकरण संदर्भात संशोधन होणे गरजेचे आहे यासाठी आरोग्य व तंत्रज्ञान क्षेत्रातील संशोधकांनी पुढे यावे. लोकसंख्या नियंत्रणासाठी जनजागृती होणे आवश्यक आहे यासाठी शासनस्तरावरुन विविध योजना राबविण्यात येतात त्याचा सर्वांनी गांभिर्याने विचार करणे गरजेचा आहे. स्थानिक संस्था व प्रतिनिधींचा सहभाग जनसामान्यात जनजागृतीत महत्वपूर्ण असून त्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील रहावे असे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी सांगितले की, आरोग्य व तंत्रज्ञान क्षेत्रात झपाटयाने प्रगती होत आहे. संशोधन ही महत्वपूर्ण बाब असून अरोग्य क्षेत्रात त्याचा मोठया प्रमाणात वापर होणे गरजेचे आहे. आरोग्य, तंत्रज्ञान व विविध क्षेत्रातील व्यक्तींना संगमच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यात आले आहे. आरोग्य विद्यापीठाने कोयटा फांऊडेशन समवेत सामंजस्य करार केला असून हेल्थ केअर संदर्भात मोठया प्रमाणात काम सुरु आहे. आयुष विभागाशी निगडीत बाबींवर काम करण्यात येत असून त्या संदर्भात पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. मेंटल हेल्थ संदर्भात अॅप्स डेव्हलप करण्यात आले असून त्याचा मानसिक आजार असणाऱ्या व्यक्तींना त्याचा उपयोग होणार आहे. ग्रामिण व दुर्गम भागात राहणाऱ्या लोकांना समुपदेशन करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

Advertisement

याप्रसंगी डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु प्रा कारभारी काळे यांनी सांगितले की, तंत्रज्ञानाचा वापर आरोग्य क्षेत्रात मोठया प्रमाणात होत असून त्यासाठी स्टार्टअपची गरज आहे. ‘संगम’ परिषदेच्या माध्यमातून उत्तम व्यासपीठ मिळाले आहे. नॅनोसायन्स संशोधनात महत्वपूर्ण बाब असून त्याचा वापर अधिक प्रमाणात करण्यात येत आहे. आरोग्य क्षेत्रात नॅनोतंत्रज्ञानाच्या मदतीने जटील कामे करणे सुलभ झाले आहे. कृत्रिम बुध्दीमत्ताच्या मदतीने विविध विभागात संशोधाचे नवीन आयाम उपलब्ध आहेत. तंत्रज्ञान क्षेत्रात डेटा कलेक्शन हे महत्वाचे काम असून त्यांचे संकलन आणि वर्गीकरण होणेही गरजेचे असते. प्राप्त माहितीचा वापर संशोधनासाठी महत्वपूर्ण असतो. तंत्रज्ञानाची मदतीने थ्रीडी व फोर-डी प्रिंटिंग करण्यात येते याचा उपयोग आरोग्य क्षेत्रात विविध आजारांच्या तपासणीत महत्वाची भूमिका बजावत आहे. मेडिकल टेक्नोलॉजीमध्ये रोबोट तंत्रज्ञानाचा वापर शस्त्रक्रिया करण्यासाठी होत आहे. मेडिकल व्हर्च्युअल रिअॅलिटीचा वापर सर्वांना होत असल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी आयआयटी बॉम्बेचे उपसंचालक प्रा एस सुदर्शन यांनी सांगितले की, विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांनी एकत्रित येऊन चर्चेच्या माध्यमातून समाजोपयोगी काम करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. संगम-2024 परिषदेत सहभागी संशोधकांनी आपले विचार मांडावेत या माध्यमातून आपणास अधिका सकारात्मक चालना मिळेल. आरोग्य विषयावर विविध इंजिनिअरींग व फार्मास्युटीकल क्षेत्रातील संशोधकांसाठी हे उत्तम व्यासपीठ असल्याचे त्यांनी सांगितले.

आयुष विषयावरील चर्चासत्राच्या प्रारंभी गुजरात आयुर्वेद विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ श्रीराम सावरीकर यांचे ’आर्वाचित आयुर्वेदायन’ पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या चर्चासत्रात विषयावर ऑल इंडिया इन्स्टिटयुट ऑफ आयुर्वेेदाच्या संचालिका डॉ तनुजा नेसरी, आयुष मंत्रालयाचे सल्लागार डॉ मनोज नेसरी, म्हैसुर आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ एन अनजानिया मुर्थी, जामनगर येथील इन्स्टिटयुट इन टिचींग अॅण्ड रिसर्च इन आयुर्वेदाचे प्राध्यापक डॉ नेहा तांक यांनी सहभाग घेतला होता.

या परिषदेत केस स्टडी ऑन वायनाड डिस्टिक्ट विषयावर केरळ येथील हेल्थ सायटिस्ट हेल्थ टेक्नोलॉजीचे डॉ बायजु एन बी, लायडन युनिव्हसिटीचे प्राध्यापक अॅंड्रयू वेब, प्रोटोन थेरपी फॉर कॅन्सर विषयावर टाटा मेमोरियल हॉस्पीटलचे प्राध्यपक डॉ सिध्दार्थ लष्कर, आर अॅण्ड डी इलेक्टॉनिक विभागाच्या प्राध्यापिका सुनिता वर्मा मेडिकल डिव्हास विषयावर मार्गदर्शन केले.
मेडेक्स डिव्हासईस एक्पो मध्ये कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी मार्गदर्शन केले. या चर्चासत्रात पॅनल डिस्कशन मध्ये जोधपूर स्कुल ऑफ पब्लिक हेल्थचे संस्थापक अनिल पुरोहित व गोदरेज इंडस्टिचे डॉ राठी गोदरेज, मोबिलिटी ऑफ कंपनीजचे संस्थापक जगदिश हर्ष, इंडियन इन्स्टिटयुट ऑफ पब्लिक हेल्थचे प्राध्यापक डॉ दिपक सक्सेना, जोधपूर एम्सचे नितीन जोशी सहभागी झाले होते.
मेंटल हेल्थ विषयावर आयोजित चर्चासत्रात एएफएफसी चे प्राध्यापक डॉ कल्पना श्रीवास्तव मानस- पॉझिटिव्ह मेंटल हेल्थ विषयावर मार्गदर्शन केले. पॅनल डिस्कशन मध्ये आय विलच्या सीओई क्षिप्रा डावर डिजिटल अॅण्ड जनरेटिव्ह ए आय अॅप्लीकेशन सहभागी झाले होते.

‘संगम 2024’ राष्ट्रीय परिषदेच्या प्रारंभी आय आय टी बॉॅम्बेचे संचालक प्रा सुभाशिष चौधरी यांनी मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयआयटी बॉॅम्बेचे उपसंचालक प्रा एस सुदर्शन यांनी केले. या परिषदेस विद्यापीठाचे प्रति-कुलगुरु डॉ मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ राजेंद्र बंगाळ, परीक्षा नियंत्रक डॉ संदीप कडू, वित्त व लेखाधिकारी एन व्ही कळसकर, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ देवेन्द्र पाटील, उपकुलसचिव डॉ सुनिल फुगारे, प्रकाश पाटील, विधी अधिकारी संदीप कुलकर्णी, शैक्षणिक अधिष्ठाता डॉ मृणाल पाटील, डॉ सौरव सेन आदी अधिकारी या परिषदेस उपस्थित होते. या राष्ट्रीय परिषदेस आरोग्य क्षेत्रातील व्यक्ती, संशोधक, अभ्यागत व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page