सौ के एस के महाविद्यालयात अत्याधुनिक व्यायाम शाळेचे उद्दघाटन संपन्न
बीड : सौ के एस के महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक व्यायाम शाळा सुरू करण्यात आली असून त्याचे उद्घाटन संस्थेचे सचिव डॉ भारतभूषण क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांनी व्यसनेच्या आहारी न जाता आपले शरीर सुद्धृढ आणि बळकट करण्यासाठी नवगण शिक्षण संस्थेच्या वतीने सौ के एस के महाविद्यालयात अत्याधुनिक अशी व्यायाम शाळा उपलब्ध करुन दिली आहे.



येथील सौ के एस के महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक व्यायाम शाळेचे उद्घाटन नवगण शिक्षण संस्थेचे सचिव व बीड नगरीचे माजी नगराध्यक्ष डॉ भारतभूषणजी क्षीरसागर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. याप्रसंगी संस्थेच्या उपाध्यक्षा डॉ दीपा क्षीरसागर, डॉ योगेश भैय्या क्षीरसागर तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शिवानंद क्षीरसागर, उपप्राचार्य डॉ संजय पाटील देवळाणकर, पदव्युत्तर पदवी विभागाचे संचालक डॉ सतीश माहुलगे, कमवि उपप्राचार्य डॉ नारायण काकडे, पर्यवेक्षक प्रा जालिंदर कोळेकर, आय क्यू सी कॉर्डिनेटर डॉ सोनाजी गायकवाड, ग्रंथपाल शेख सर, कार्यालयीन अधीक्षक डॉ विश्वंभर देशमाने, डॉ एस व्ही गुट्टे, क्रीडा विभागप्रमुख डॉ भागचंद सानप, प्रा अमृतसिंग बिसेन व महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.