यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात प्रा राम ताकवले स्मृती उद्यानाचे भूमीपूजन
नाशिक : प्रा डॉ राम ताकवले सरांनी आपल्या अथक परिश्रमाने दूरशिक्षण क्षेत्रातील या अभिनव संकल्पनेला यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची निर्मिती करून महाराष्ट्र राज्यातील उच्च शिक्षणापासून अनेकविध कारणांनी दूर गेलेल्या समाजातील असंख्य लोकांकरीता त्यांचा शिक्षणध्यास पूर्ण करण्याकरीता मूहूर्तमेढ रोवली आहे. आजपर्यंत या विद्यापीठामार्फत हजारो लोकांनी शिक्षणाच्या, ज्ञानाच्या मार्गावर यशस्वी वाटचाल करून आपले आयुष्य सुखकर केले आहे, उच्च शिक्षणाचे आपले ध्येय गाठले आहे.
प्रा. डॉ. राम ताकवले सरांच्या कार्याचा गौरव व्हावा, विद्यापीठाच्या प्रांगणात त्यांच्या असंख्य स्मृती जतन केल्या जाव्यात याकरीता त्यांचे एक स्मारक निर्माण व्हावे, या उद्देशाने मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या संकल्पनेतून विद्यापीठ परिसरात प्रा. राम ताकवले स्मृती उद्यानाचा भूमीपूजन सोहळा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. नितीन करमळकर यांच्या हस्ते संपन्न झाला.
या स्मृती उद्यानात प्रा. राम ताकवले सरांचा अर्धकृती पुतळा बसविण्यात येणार आहे. तसेच शाश्वत विकास करण्याच्या दृष्टीने जैव विविधता उद्यान तयार करण्यात येणार आहे. यामध्ये विविध प्रकारची औषधी वनस्पती, वेगवेगळ्या फुलांची झाडे, देशी प्रजातीची झाडे लावण्यात येणार आहे अशी माहिती कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांनी दिली.
याप्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू प्रा. पराग कालकर, यांची प्रमुख उपस्थित होती. कार्यक्रमास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विजय खरे, प्रसेनजीत फडणवीस, मुक्त विद्यापीठाचे कार्यकारी अभियंता राजेश भावसार, संचालक डॉ. प्रकाश देशमुख, डॉ. राम ठाकर, माधव पळशीकर, डॉ. संजीवणी महाले, डॉ. चेतना कमळस्कर, डॉ. माधूरी सोनवणे, राजेंद्र वाघ, डॉ. दयाराम पवार, डॉ. नितीन ठोके, किरण हिरे, सुनिल विभांडीक, तसेच मुक्त विद्यापीठाचे प्राध्यापक, शिक्षक, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.