अमरावती विद्यापीठाचा अर्थशास्त्र विभाग आणि भारतीय सामाजिक विज्ञान संशोधन परिषद यांचा संयुक्त उपक्रमाचे आयोजन
विद्यापीठात क्षमता वाढ कार्यक्रमाचे 11 ते 23 मार्च दरम्यान आयोजन
अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा अर्थशास्त्र विभाग आणि भारतीय सामाजिक विज्ञान संशोधन परिषद (आय.सी.एस.एस.आर.) यांचे संयुक्त विद्यमाने दि. 11 ते 23 मार्च, 2024 दरम्यान ‘‘संशोधनात क्रांती : सामाजिक विज्ञान संशोधनातील नाविन्यपूर्ण संशोधन पद्धती आणि अनलॉकिंग अंतदृष्टी’’ यावर दोन आठवड¬ाचा क्षमता वाढ कार्यक्रमाचे आयोजन विद्यापीठ परिसरातील ज्ञानरुाोत केंद्राच्या सभागृहात करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे स्वरुप –
दि. 11 मार्च, 2024 रोजी सकाळी 11.00 वाजता उद्घाटन समारंभ संपन्न होणार असून समारंभाचे अध्यक्षस्थान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते भूषवतील. प्रमुख अतिथी म्हणून बिंझानी सिटी महाविद्यालय, नागपूरचे प्राचार्य प्रो. सुजित जी. मेत्रे उपस्थित राहणार असून विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. रविंद्र कडू व विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रसाद वाडेगावकर यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभणार आहे.
दि. 23 मार्च, 2024 रोजी दुपारी 3.00 वाजता समारोपीय कार्यक्रम संपन्न होणार असून अध्यक्षस्थान विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रसाद वाडेगावकर भूषवतील. प्रमुख अतिथी म्हणून जी एच रायसोनी अभिमत विद्यापीठ, अमरावतीचे कुलगुरू प्रो. विनायक देशपांडे उपस्थित राहणार असून विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. प्रविण रघुवंशी व विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू डॉ. राजेश जयपूरकर यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभणार आहे.
तरी आयोजित क्षमता वाढ कार्यक्रमात जास्तीतजास्त संख्येने नोंदणी करुन सहभागी होण्याचे आवाहन विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. तुषार देशमुख व कार्यक्रमाचे संयोजक डॉ. रविंद्र सरोदे यांनी केले आहे. अधिक माहितीकरीता तसेच कार्यक्रमाच्या नोंदणीकरीता डॉ. रविंद्र सरोदे यांना प्रत्यक्ष अथवा दूरध्वनी क्र. 9503457546 यावर संपर्क साधता येईल, असे विद्यापीठाच्यावतीने कळविण्यात येत आहे.