‘स्वारातीम’ विद्यापीठाच्या उपपरिसर लातूर येथील प्राध्यापकांना पेटंट प्रदान
नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या उपपरिसर लातूर येथील प्रा. डॉ. राजेश शिंदे, प्रा. डॉ. हनुमंत पाटील व प्रा. डॉ. विकास हुबे यांनी ‘ऑफीस डेस्क डिव्हाइस फॉर टास्क मॅनेजमेन्ट’ यावर डिझाईन पेटंट प्राप्त केले आहे. या पेटंटमध्ये छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील डॉ. अभिज शळके, डॉ. सुयोग अमृतराव, डॉ. विक्रम शिंदे व डॉ. सचिन बसयै यांचाही समावेश आहे.
त्यांच्या या यशाबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, कुलसचिव डॉ. शशिकांत ढवळे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. दिगंबर नेटके, अधिष्ठाता डॉ. डी. एम. खंदारे, वित्त व लेखाधिकारी डॉ. श्रीकांत अंधारे यांच्यासह विद्यापीठातील शिक्षक, अधिकारी व कर्मचारी यांनी शुभेच्छा देवून अभिनंदन केले.