राजमाता जिजाऊ महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा

॥ माझा मऱ्हाटीचि बोलु कवतुके परी अमृतातेही पैजेसी जिंके ॥

घोडेगाव : संस्थापक अध्यक्ष साईनाथ पाटील जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज राजमाता जिजाऊ वरीष्ठ महाविद्यालय, राजीव गांधी कनिष्ठ महाविद्यालय, सद्गुरू जनेश्वर माध्यमिक विद्यालय, व स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालय घोडेगाव ता. खुलताबाद येथे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष साईनाथ पाटील जाधव, मुख्य अतिथी म्हणून डाॅ. शाहु पाटोळे सर (निवृत्त क्षेत्रीय प्रसारण अधिकारी) लेखक, साहीत्य पत्रकार, PIB (Press Information Bureau), Field Publicity, Defence PRO, All India Radio, Kohima ( head of News), Ex Dy. Director News (दूरदर्शन मुंबई), जीवन कुलकर्णी (प्रकाशक) नीरा प्रकाशन, प्रशांतसिंग राजपुत ( लेखा परीक्षक, लेखा परीक्षण विभाग, महाराष्ट्र शासन छत्रपती संभाजीनगर) विजय पाटील जाधव उपस्थित होते.

Advertisement

यानंतर व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांच्या सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. आलेल्या सर्व मुख्य अतिथींचे साईनाथ पाटील जाधव साहेब यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष साईनाथ पाटील जाधव साहेब यांनी केले. प्रशांतसिंग राजपुत यांनी विद्यार्थ्यांना मराठी भाषा संवर्धन यावर मार्गदर्शन केले. शेवटी आजचे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित शाहु पाटोळे साहेब यांचे भाषण झाले. त्यांनी त्यांच्या सुंदर शैलीत मराठी भाषेचे महत्त्व विशद केले. मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी प्रयत्न करावेत. विद्यार्थ्यांनी अवांतर मराठी साहित्याचे वाचन करावे. त्यांना आयुष्यात आलेले अनुभव सांगितले. विद्यार्थ्यांना प्रश्न विचारले. विद्यार्थ्यांचे शंकानिरसन केले. त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. पाटोळे सर यांनी स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालयास त्यांनी लिहीलेली सर्व पुस्तके वाचनालयास भेट दिली.

कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका ठाकूर मॅडम व आभार प्रदर्शन संदीप जाधव सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यास प्रशासकीय अधिकारी, प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page