श्री बंकटस्वामी महाविद्यालयाचे श्री क्षेत्र कपिलधार येथे निवासी शिबिराचे उद्घाटन संपन्न
सृजन आणि श्रम प्रतिष्ठेसाठी राष्ट्रीय सेवा योजना – राहुल गिरी
बीड : श्री बंकटस्वामी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे पर्यावरण व जलसंवर्धनासाठी युवा या विशेष युवक-युवती निवासी शिबिर श्री क्षेत्र कपिलधार कपिलधारवाडी येथे उद्घाटन संपन्न. याप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून श्री बंकटस्वामी शिक्षण संस्था खडकी घाट चे सचिव आर. एच. भोसले, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विवेक मिरगणे, प्रमुख मार्गदर्शक म्हणून सुप्रसिद्ध युवा वक्ते तसेच वाय. ई. डब्ल्यू. एस. अभियानाचे मराठवाडा विभाग समन्वयक राहुलजी गिरी, उपप्राचार्य डॉ. शिवाजी मोरे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. ब्रह्मनाथ मेंगडे, बीड जिल्हा समन्वयक व कार्यक्रमाधिकारी डॉ. अरुण दैतकार आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उद्घाटक आर. एच. भोसले यांनी विद्यार्थ्यांना श्रम संस्काराची शिकवण देते. राष्ट्रीय सेवा योजनाच्या माध्यमातुन युवकांचे व्यक्तिमत्व विकास होतो असे प्रतिपादन केले. प्रमुख मार्गदर्शक राहुलजी गिरी पुढे बोलताना म्हणाले की, सृजन, श्रम प्रतिष्ठा, स्वावलंबन, चारित्र्य संवर्धन व सामाजिक बांधिलकी या मुल्यांचा समन्वय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण करून सर्वांगिण व्यक्तिमत्व विकास घडवुन आणण्याचे काम राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष युवक युवती शिबिरांमधून होत असतो. आजच्या युवकाचा कल मोबाईल मधून सोशल मीडिया अत्याधिक वापरण्याचा कल वाढत असून विविध गेम द्वारे त्यांचा सृजनात्मक वेळ विनाकारण खर्ची पडत आहे आणि यामुळे तरुणाईची विघटनशीलता वाढत असल्याचे दिसून येते. विद्यार्थ्यांनी इतरांचे पोस्ट लाईक करण्यापेक्षा स्वतःची लायकी वाढवून आपल्या आई-वडिलांचे स्टेटस वाढवावे. याद्वारे युवकांनी राष्ट्राच्या उन्नतीसाठी मार्गक्रम करत राहिले पाहिजे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. विवेक मिरगणे यांनी अध्यक्षीय समारोप करताना राष्ट्रीय सेवा योजना शिबिरातून एक उत्तम व्यक्तिमत्व निर्माण करण्याचे काम होत असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यक्रमाधिकारी डॉ.प्रकाश कोंका यांनी तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाधिकारी डॉ. मनोजकुमार नवसे यांनी केले. कार्यक्रमाधिकारी प्रा. राजाभाऊ नागरगोजे यांनी उपस्थितांचे व मान्यवरांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यक्रमाधिकारी डॉ. शंकर शिवशेट्टे, डॉ. शंकर धांडे डॉ.जगन्नाथ चव्हाण डॉ. आर. टी. माने, प्रा. रणजीत आखाडे, संभाजी गायकवाड, अर्जुन निंबाळकर यांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी विद्यार्थिनी स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.