कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयात राष्ट्रीय मतदाता दिवसानिमित्त शपथ ग्रहण
रामटेक : भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना दि. 25 जानेवारी 1950 रोजी झाली. भारतीय नागरिकांमध्ये मतदानाविषयी जागरुकता निर्माण व्हावी व त्यांना त्यांच्या कर्तव्याविषयी जाणीव रहावी, याकरिता दि. 25 जानेवारी 2011 पासून राष्ट्रीय मतदाता दिवस साजरा करण्यात येतो.याच अनुषंगाने कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय, रामटेक येथे राष्ट्रीय सेवा योजनेद्वारे दि. 25 जानेवारी 2024 रोजी राष्ट्रीय मतदाता दिवस साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमात विश्वविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मतदाता शपथ ग्रहण केली. या कार्यक्रमामध्ये सर्व विद्यार्थी उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमास प्रा. शरदचंद्र श्रीनिल व प्रा. संतोष कोल्हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी सचिन डावरे यांनी केले.