मिल्लीया महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचा समारोप
विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय एकात्मता निर्माण व्हावी – खान सबिहा
बीड : मिल्लीया कला, विज्ञान व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग व डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 25 जानेवारी ते 31 जानेवारी 2025 पर्यंत आयोजित करण्यात आलेल्या “माझ्या भारतासाठी व डिजीटल साक्षरतेसाठी युवक” (Youth for my Bharat and Youth for digital literacy) युवा-युवती विशेष हिवाळी निवासी शिबिराचा समारोप मौजे कामखेडा ता जि बीड येथे संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंजुमन इशात-ए -तालीम संस्थेच्या सचिव खान सबिहा बेगम, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मोहम्मद इलयास फाजील, प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार सी आर पटेल सर, मौजे कामखेडाचे सरपंच शेख मीना बेगम, उपसरपंच रतनबी महमूद, ग्रामपंचायत सदस्य शेख मुसा, ग्रामपंचायत सदस्य प्रदीप थोरात, बिलाल पटेल, अमीर पटेल, शेख शफिक, अनीस बेग, शेख सलीम, सुहास मस्के, उपप्राचार्य डॉ सय्यद हनीफ, उपप्राचार्य प्रोफेसर हुसैनी एसएस, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रोफेसर मिर्झा असद बेग, डॉ शेख रफीक, प्राध्यापिका डॉ शेख एजाज परवीन यांची उपस्थिती होती.
दिनांक 25 जानेवारी पासून सुरू असलेल्या या विशेष निवासी शिबिरात डिजिटल इंडिया भारत सरकारने सुरू केलेली विशेष मोहिमेबद्दल जागृती करण्यात आली, विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छता,आरोग्य, पर्यावरण, साक्षरता, प्लास्टिक मुक्त अभियान, राष्ट्रीय एकात्मता तसेच बालविवाह प्रतिबंध याविषयी जनजागृती निर्माण व्हावी, श्रमदान व वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन यांचे महत्त्व तसेच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिगत विकास व सामाजिक प्रबोधनासाठी विविध वक्त्यांची व्याख्याने आयोजित करण्यात आली होती असे राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ शेख रफीक यांनी सांगितले.
राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थी शेख जशनैन व जूनैद तंबोली यांनी शिबिराबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. प्रमुख अतिथी मौजे कामखेडाच्या सरपंच शेख मीना बेगम यांनी विद्यार्थी घडविण्याचे काम हे राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून होते, विद्यार्थ्यांनी लोकांमध्ये ग्राम स्वच्छता,आरोग्य, बालविवाह प्रतिबंध, वृक्षारोपण, वृक्ष संवर्धन, डिजिटल साक्षरता याविषयी जनजागृती निर्माण केली व त्यांनी गावामध्ये सात दिवस केलेले कार्य कौतुकास्पद आहे असे सांगितले.
पत्रकार सी आर पटेल सर यांनी सांगितले की विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षणाचा उपयोग समाजाच्या प्रगतीसाठी करावा तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आरोग्य, स्वच्छता व श्रमदानाचे महत्व समजून घ्यावे व त्याचा उपयोग गावाच्या, समाजाच्या प्रगतीसाठी करावा, राष्ट्रीय सेवा योजनेची शिकवण नॉट मी.. बट यू ..आपल्या जीवनात आत्मसात करावी असे सांगितले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मोहम्मद इलियास फाजील यांनी विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी, व्यक्तिमत्व विकासासाठी विद्यार्थ्यांमध्ये शिस्त तसेच समाजकार्य करण्याची आवड निर्माण व्हावी व त्यांनी देशाचे चांगले नागरिक व्हावे यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर आयोजित करण्यात येते तसेच शिबिरात स्वयंसेवक विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकास व समाजाबरोबर एकरूप होण्याची संधी मिळते असे सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा संस्थेचे सचिव खान सबिहा बेगम यांनी एक चांगला व्यक्ती होण्यासाठी विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच चांगले संस्कार होणे आवश्यक आहे व विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय एकात्मता निर्माण व्हावी असे सांगितले. कार्यक्रमास पदव्युत्तर विभागाचे संचालक तथा एनईपी सेलचे अध्यक्ष प्रोफेसर सय्यद फरीद अहमद नेहरी, नॅक समन्वयक प्रोफेसर अब्दुल अनीस, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थी, प्राध्यापकवृंद, कर्मचारीवृंद, कामखेडाचे ग्रामस्थ यांची उपस्थिती होती. कार्यक्रमचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेची कार्यक्रमाधिकारी प्रोफेसर मिर्झा असद बेग यांनी तर आभार डॉ शेख रफीक यांनी व्यक्त केले.