राष्ट्रीय शिक्षण धोरणात आवडीप्रमाणे शिक्षण घेऊन प्रगतीची संधी – कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर

स्कूल कनेक्ट अभियानाचा सोशल व दयानंद कॉलेजमधून प्रारंभ

सोलापूर : नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणात आपल्या आवडी व छंदाप्रमाणे शिक्षण घेण्याची संधी असून कौशल्य व रोजगाराभिमुख शिक्षण घेऊन विद्यार्थ्यांनी प्रगती साधावी, असे आवाहन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांनी केले. नवीन ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण-2020’ मुळे उच्च शिक्षण व्यवस्थेचे संपूर्ण नूतनीकरण आणि व्यापक बदल होत असल्याने त्याची कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती होणाच्या उद्देशाने ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 स्कूल कनेक्ट’ संपर्क अभियान शहर व जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. याचा शुभारंभ मंगळवारी सोशल कॉलेज आणि दयानंद महाविद्यालय येथून कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

Advertisement

यावेळी त्यांच्यासोबत प्र-कुलगुरू प्रा. डॉ. लक्ष्मीकांत बसवराज दामा आणि अंतर्गत गुणवत्ता कक्षाचे संचालक प्रा. डॉ. गौतम कांबळे यांच्यासह महाविद्यालयांचे प्राचार्य व शिक्षक उपस्थित होते. यावेळी कुलगुरू प्रा. महानवर यांनी नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा आढावा घेत शिक्षण क्षेत्रातील बदलाची माहिती दिली.विद्यार्थ्यांची क्रेडिट बँक, कौशल्य विकास कोर्सेस आणि दरवर्षी मिळणारे विविध प्रमाणपत्र आणि आव्हाने पेलण्यासाठी या नव्या शिक्षण धोरणात चांगले बदल करण्यात आले आहेत. निश्चितच याचा प्रगतीसाठी फायदा होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. डॉ. गौतम कांबळे यांनी जगातील शिक्षण व्यवस्थेची माहिती देत नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाची वैशिष्ट्ये सांगितले. सोशल महाविद्यालयात कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्राचार्य डॉ. इ. जा. तांबोळी यांनी  केले.

Opportunity to progress by taking education as per the national education policy - Vice-Chancellor Prof. Dr. On Prakash Mahan

यावेळी आंतरविद्याशाखा प्रभारी अधिष्ठता प्रा. डॉ. राजशेखर हिरेमठ, सिनेट सदस्य डॉ. वीरभद्र दंडे, सुपरवायझर प्रा. डॉ. जैनुद्दीन पटेल उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. डॉ. शफी चोबदार यांनी केले व आभार प्रा. डॉ. जैनुद्दीन मुल्ला  मानले.दयानंद महाविद्यालयामध्ये कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्राचार्य डॉ. व्ही. पी. उबाळे यांनी केले. यावेळी प्राचार्य डॉ. आर. व्ही. शिंदे, प्राचार्य डॉ. एस. बी. क्षीरसागर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार डॉ. रविराज रणवरे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page