एमबीबीएस करण्यासाठी भारतीय विद्यार्थी युक्रेनला का जातात ?

एमबीबीएस करण्यासाठी भारतीय विद्यार्थी युक्रेनला का जातात ?
March 11, 2022 Sunil Rajput 0 View 0 Comments admission, Bukovinian State Medical University, cheep education, Indian Government, Kyiv, Kyiv Medical University, MBBS, mbbs in ukraine for indian students, Ministry of external affairs, neet 2022, NMC, Odessa National Medical University, Operation Ganga, Poltava State Medical University, Russia Ukrain War, UkraineEdit
Spread the love

देशात एमबीबीएस या वैद्यकिय शाखेत प्रवेश घेण्यासाठी खूप स्पर्धा आहे. यात वैद्यकिय शिक्षण घेण्यासाठी नीट परीक्षा द्यावी लागते. तसेच परीक्षा पात्र झाल्यावरच श्रेणी नुसार वैद्यकिय शाखेत प्रवेश मिळतो. MBBS in ukraine for indian students तरी या परीक्षा न देता सरळ युक्रेन गाटले तरी एमबीबीएस करता येते.

कशी असते नीट परीक्षा ?

नीट ( NEET ) या इंग्रजी शब्दाचे विस्तारित रूप पुढीलप्रमाणे आहे. NEET – NATIONAL ELIGIBILITY CUM ENTRANCE TEST असे आहे. 2013 आधी NEET ला All India Pre Medical Test (AIPMT) म्हटले जात होते. या परीक्षेला सर्वोच्च न्यायालयाने असवैधानिक ठरविले होते. 2014 व 2015 या वर्षी नीट न होता अखिल भारतीय वैद्यकिय प्रवेश पूर्व परीक्षा AIPMT घेण्यात आली . पण परत 2016 पासून पुढे NEET परीक्षा कायम करण्यात आली.

mbbs in ukraine for indian students

आता आपण वळूया की का विद्यार्थी भारत सोडून परदेशात किंवा खास युक्रेनला जातात. आपल्याला यासाठी भारतातील प्रवेश प्रक्रिया समजून घ्यावी लागेल. भारतातील विद्यार्थी वैद्यकिय शिक्षण घेण्यासाठी नीट परीक्षा देतो यात त्याचा सर्वात वरचा कोर्स एमबीबीएस प्रवेश मिळणे हे स्वप्न असते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विद्यार्थी दिवस रात्र मेहनत घेत असतो. चांगल्या महाविद्यालयात प्रवेश घेणे, शिकवणी लावणे, आता तर ऑनलाइन सबस्क्रिप्शन उपलब्ध झाले आहे. हे सर्व प्रकार तो करत एकदाची नीट परीक्षा देतो.

दर वर्षी जवळपास 15 लाख विद्यार्थी ही परीक्षा देतात यातील फक्त 8 लाख विद्यार्थी पात्र होतात. तर प्रवेश घेण्यासाठी असतात 84 हजार जागा..! म्हणजेच आपल्या लक्षात येते की किती प्रमाणात स्पर्धा आहे. यात बारावीचे गुण गृहीत धरल्या जात नाही. इथेच खरी गोम आहे. की विद्यार्थी देशातील शिक्षणापेक्षा परदेशात प्राधान्य देतो यात सर्वात स्वस्त शिक्षण असेल तर ते आहे युक्रेनला…!

Advertisement

आता वर उल्लेख केल्या प्रमाणे जवळपास 6 लाख विद्यार्थी हे एमबीबीएस प्रवेशला मुकलेले असतात. आता यातील विद्यार्थी खाजगी महविद्यालयात प्रवेश घेण्याची क्षमता नसते, तसेच आरक्षण यामुळे प्रवेश मिळत नाही अशी अडचण विद्यार्थ्याची होते . तेव्हा त्यांच्या समोर पर्याय उभे राहतात ते परदेश शिक्षण घेण्याचे.

mbbs in ukraine for indian students

सर्वात स्वस्त एमबीबीएस शिक्षण घेण्यासाठी परदेशातील पर्याय असतो तो युक्रेनच्या विद्यापीठाचा..! युक्रेनमध्ये भारताच्या तुलनेत फक्त 25 लाखात एमबीबीएसचे शिक्षण होते या उलट भारतात जवळपास 1 कोटी रुपये लागतात. 2016 ला सर्वोच्च न्यायालयानं महाविद्यालयांना कॅपिटेशन फी आकाराला परवानगी दिली. ही फी तब्बल 600 पट जास्त होती. त्यामुळे एमबीबीएस चे शिक्षण महागले. भारतातील मध्यम वर्गातील विद्यार्थी या अतिशय स्वस्त असलेल्या देशाला प्रथम पसंती देतात.

युक्रेनमध्ये कोणत्याच प्रकारची प्रवेश परीक्षा देण्याची आवश्यकता नसते. भारतासारख्या नीट परीक्षा देण्याची गरज नाही. लोकसंख्येच्या मानाने प्रवेश प्रक्रिया खूप सोपी असते. त्यामुळे भारतासह अनेक देशातील विद्यार्थी येथे प्रवेश घेण्यासाठी येतात. याउलट देशात प्रवेश घेण्यातही किमान गुणांची पात्रता पार पाडावी लागते .

देशात जातीचे आरक्षण असल्यामुळे खुल्या प्रवर्गातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात एमबीबीएस प्रवेश घेण्यासाठी असतात ते बाहेर फेकले जातात.आता पर्यंत खालील प्रमाणे प्रवर्गानुसार पात्रता गाठावी लागते

किमान गुण :

सामान्य प्रवर्ग – 50%

आरक्षित प्रवर्ग – 40%

यामुळे हे खुला प्रवर्गातील विद्यार्थी मध्यम वर्ग तसेच उच्च मिळकत असलेले विद्यार्थीचे पालक लगेच युक्रेनला पसंती देतात . तरी तुम्हाला कळले असेल MBBS in ukraine for indian students का करतात.युक्रेन मध्ये नवीन राष्ट्रीय वैद्यकिय आयोग यांची मान्यता असलेले खालील विद्यापीठ आहे. यामुळे भारतीय विद्यार्थ्यांना भारतात आल्यानंतर जास्त अडचण येत नाही .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page