उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पापूर्वी घेतला आढवा!

मुंबई : उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे आर्थिक वर्ष २०२३-२४ चा राज्याचा अर्थसंकल्प (Budget) सादर करणार आहेत. यासंदर्भात विविध विभागांच्या मागण्यांची तरतूद व पूर्ण केलेल्या कामांचा त्यांनी आज (3 फेब्रुवारी) आढावा घेतला.
यावेळी पुढील वार्षिक योजनांच्या मागण्यासंदर्भात त्यांनी विस्तृत चर्चा केली. विभागाच्या नाविन्यपूर्ण व महत्त्वाच्या योजना पूर्ण करण्याच्या अनुषंगाने त्यांनी संबंधितांना सूचना केल्या.
वार्षिक योजना सन २०२३-२४ ची आखणी संदर्भात मंत्रालयीन विभागस्तरीय बैठकीचे आयोजन सह्याद्री अतिथीगृह येथे करण्यात आले होते. यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, ग्रामविकास व पंचायत राज, क्रीडा व युवक कल्याण, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये, अन्न व औषध प्रशासन, फलोत्पादन, रोजगार हमी योजना, राज्य उत्पादन शुल्क, इतर मागास बहुजन कल्याण, सहकार, महिला व बालविकास, कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता तसेच पर्यटन या विभागांच्या कामाचा व मागण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आढावा घेतला.
पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास व पंचायत राज, क्रीडा व युवक कल्याण, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन, फलोत्पादन व रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे, महिला व बालविकास, कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता, पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा, सहकार, इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्री अतुल सावे यांच्यासह राज्य उत्पादन शुल्क, नियोजन आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page