के एस के महाविद्यालयात युवा संवाद पंचप्रण कार्यक्रम संपन्न

युववकांनी शिक्षणाचा उपयोग देशासाठी केला पाहिजे – डॉ योगेश भैय्या क्षीरसागर

बीड : डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर व केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर ऊर्फ काकू कला,विज्ञान व वाणिज्य  महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्यावतीने युवा संवाद पंचप्रण इंडिया @ 2047 कार्यक्रमाचे उद्घाटन युवानेते  व नवगण शिक्षण संस्थेचे सहसचिव डॉ योगेश भैय्या क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी बोलताना युवानेते डॉ योगेश भैय्या क्षीरसागर म्हणाले की, आजच्या युवकांनी शिक्षण देशहितासाठी उपयोगी पडेल यासाठी शिक्षण घ्यावे.तसेच तरूणांनी वेळेचे व्यवस्थापन करावे,आपली जबाबदारी,कर्तव्य योग्यपध्दतीने करावे.

यासाठी युवकांनी शैक्षणीक पात्रता निर्माण करताना आपली पदवी ही प्रविण्यातून घेऊन त्यामध्ाून शिक्षणाचा उपयोग राष्ट्रहित,समाजहित यासाठी करावा.आता आपण नविन शैक्षणीक धोरणाचा अवलंब करत असून त्यामधून  विद्यार्थ्यांना केवळ एक पदवी न घेता अनेक पदव्या या पुढील काळात घेण्याची संधी प्राप्त होणार आहे. त्यामुळे युवकांनी शिक्षण घेताना ते देशहित, राष्ट्रहित,समाजहित यासाठीच करावे. असे मत व्यकत केले आता युवकांनी त्यांचा युवानेता निवडताना त्या नेत्याचे योगदान,शैक्षणिक ,सामाजिक,सांस्कृतिक,कार्यप्रणाली कशी आहे हे तपासूनच युवा नेत्यांची निवड करावीअसे मत व्यक्त केले.

Advertisement

या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्राचार्य डॉ विवेक मिरगणे यांनी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या या युवासंवाद कार्यक्रमात युवकांनी पंचप्रण म्हणजेच पाच तत्वांचा अंगीकार केला पाहिजे  पंचप्रण   यात युवकांनी विकसीत भारताचे ध्येय गुलामीच्या सर्व खुणा पुसून टाकल्या पाहिजेत.भारत हा विविध भाषा बोलीबोलणारा एक संघ राष्ट्र असून बालपणी प्राथामिक व माध्यमिक शाळेत विद्यार्थ्यांना प्रतिज्ञा,राष्ट्रगीत व राष्ट्रीयत्व निर्माण करणार्‍या विविध पैलू सातत्याने शिकविल्या जातात परंतु आज महाविद्यालयीन शिक्षणात विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीयत्व निर्माण होईल अशा प्रकारचे शिक्षण कमी प्रमाणात मिळते.आजच्या तरूणांनी तंत्रशिक्षणाबरोबरच त्यांच्यामध्ये राष्ट्रहितासाठी त्यांच्यात शक्ती,उपासना निर्माण झाली पाहिजे यापध्दतीचे शिक्षण मिळाले पाहिजे.तरूणांच्या मनातून गुलामीची जाणीव निघून गेली पाहिजे असे मत व्यक्त केले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्ष पदावरून बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शिवानंद क्षीरसागर म्हणाले की, आजच्या युवकांनी महाविद्यालयातील सर्व शैक्षणिक सोयीसवलतीचा लाभ घेऊन युवकांनी सक्षम होण्यासाठी शिक्षण घेतले पाहिजे व देश सक्षम बनविण्यासाठी  आपल्या ज्ञानाचा उपयोग करावा असे मत व्यकत केले. या कार्यक्रमासाठी बीड जिल्हयातील विविध महाविद्यालयातील पासष्ट राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक हजर होते. जिल्हा समन्वयक डॉ अरूण दैतकार, गट समन्यक डॉ रवी सातभाई, कार्यक्रमाधिकारी डॉ सोमनाथ लांडगे, तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ संजय पाटील देवळाणकर, पदव्युत्तर संचालक डॉ सतीश माऊलगे, कमवि उपप्राचार्य डॉ नारायण काकडे, पर्यवेक्षक जालिंदर कोळेकर,कार्यक्रमाधिकारी डॉ पंडित खाकरे, डॉ नागेश शेटे, डॉ अन्सार उल्ला खान या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ अनिता शिंदे यांनी मानले. या कार्यक्रमास विविध महाविद्यालयाचे रासेयो चे स्वयंसेवक, कार्यक्रमाधिकारी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी  उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page