राष्ट्रीय सेवा योजना शिबिरातून युवकांना जीवनाची दिशा मिळते – डॉ अशोक मते
बीड : श्री क्षेत्र कपिलधार येथे श्री बंकटस्वामी महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना निवासी शिबिराच्या बौद्धिक क्षेत्रांमध्ये मानसिक स्वास्थ्य आणि युवा या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी बीड जिल्हा रुग्णालयाचे प्रकल्प समन्वयक डॉ अशोक मते उपस्थित होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा विवेक वैद्य तर प्रमुख उपस्थितीमध्ये डॉ. प्रा. राजाभाऊ माने प्रा. डॉ प्रकाश कोंका कार्यक्रमाधिकारी प्रा. राजाभाऊ नागरगोजे व्यासपीठावर उपस्थित होते. याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणाले की आज इंटरनेटच्या युगामध्ये आजचा युवक मानसिक स्वास्थ्य बिघडून बसला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक रील्स अनेक घटना या युवकांच्या मनावर परिणाम करतात यामधून अनेक भडक दृश्य, भडक विचार, सामाजिक भान नसणारे मेसेजेस युवकांच्या वर्तनावर परिणाम करतात त्यामुळे इतर लोकांशी कनेक्ट राहा प्रत्यक्ष तसेच तसेच नवीन कौशल्य आत्मसात करण्याचा प्रयत्न करा आणि वर्तमान क्षण जगण्यासाठी शिका अति विचार करणे टाळा आपापसातील सकारात्मक संवाद वाढवण्याचे काम युवकांकडून केले जावे तसेच समाजसेवेची जाणीव आजच्या युवकांमध्ये व्हावी हा उद्देश ठेवून अशा शिबिरामधून खऱ्या अर्थाने युवक समाजशील निर्माण करण्याचे काम राष्ट्रीय सेवा योजना करीत आहे.
सर्वांगीण विकास व्हावा ग्रामीण जीवन कशा पद्धतीने चालतं याचा अभ्यास शहरी युवकांना व्हावा या उद्देशाने हे शिबिर खऱ्या अर्थाने काम करते.युवकांमध्ये सूजनशीलता निर्माण करण्याचे काम देखील या शीबीरामधून होताना दिसते.मोबाईल पासून सात दिवस इथला स्वयंसेवक या शिबिरात राहून एक प्रकारे आभासी जगापासून वास्तव जगाकडे डोळसपणे बघण्याचे काम या श्री क्षेत्र कपिलधार या ठिकाणी शिबिरामध्ये स्वयंसेवक प्रशिक्षित होत आहेत यात शंकाच नाही. असे मत त्यांनी प्रसंगी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यक्रमाधिकारी डॉ प्रकाश कोंका यांनी केले तर आभार प्रदर्शन कार्यक्रमाधिकारी प्रा.राजाभाऊ नागरगोजे यांनी मानले याप्रसंगी कार्यक्रमाधिकारी डॉ. मनोजकुमार नवसे डॉ. शंकर शिवशेट्टे तसेच ग्रामस्थ स्वयंसेवक याप्रसंगी बहुसंख्येने उपस्थित होते.