गोंडवाना विद्यापीठात युवा साहित्य संमेलनाचे थाटात उद्घाटन
साहित्य माणसे जोडणारा महत्वाचा दुवा – डॉ किशोर कवठे
गडचिरोली : मराठी साहित्याला खूप मोठी परंपरा आहे. त्यामुळे केवळ एकाच विचारधाराचे साहित्य न वाचता सर्वसमावेशक असावे. तसं पाहता आता वाचन कमी झालेले आहे. त्यामुळे वाचनाकडे तरुणांचा कल कसा वाढेल, वाचन संस्कृती आपल्याला कशी वृद्धिंगत होईल करता येईल. साहित्याने माणसांना जोडता येते .त्यामुळे साहित्य माणसं जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे असे प्रतिपादन संमेलनाध्यक्ष सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. किशोर कवठे यांनी केले.
गोंडवाना विद्यापीठाच्या वतीने दोन दिवसीय युवा साहित्य संमेलनाचे उद्घाटन आज साहित्यव्रती गो. ना. मुनघाटे साहित्यनगरी येथे पार पडले. येथील क्रांतिवीर बाबुराव शेडमाके मंचावर स्वागताध्यक्ष कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, उद्घाटक व सत्कारमूर्ती ९७ वे अभा मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे, विशेष अतिथी म्हणून डॉ. अभय बंग,कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण, संचालक रासेयो डॉ. श्याम खंडारे, यवतमाळचे जागतिक साहित्य अभ्यासक प्रा. ज्ञानेश्वर गटकर, बांबू प्रशिक्षक मीनाक्षी वाळके आदी उपस्थित होते.
उद्घाटनापूर्वी सकाळी ग्रंथदिंडी
साहित्यव्रती गो. ना. मुनघाटे साहित्यनगरी येथून इंदिरा गांधी चौक ते परत साहित्य नगरीत विसर्जित करण्यात आली. यावेळी संमेलनाध्यक्ष किशोर कवठे, रासेयो संचालक डॉ. श्याम खंडारे , प्रा. राम वासेकेर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यानंतर गडचिरोली गौरव गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली हे गीत धात्रक सर आणि समूह यांनी सादर केले.सुप्रसिद्ध कवी प्रा. पुनीत मातकर
यांच्या ‘विणीचा हंगाम’ या कवितासंग्रहासाठी राज्य शासनाचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचा उपस्थित मान्यवरांकडून सत्कार करण्यात आला.
रविंद्र शोभणे यांचा परिचय जनसंवाद विभागाचे स. प्रा. रोहित कांबळे, अभय बंग यांचा परिचय स. प्रा. संजय डाफ ,
यांनी करून दिला.
अभ्यासक जागतिक साहित्य , यवतमाळ आणि बांबू प्रशिक्षक मिनाक्षी
वाळके यांचीही समयोचित भाषणे झालीत.
प्रास्ताविक समनव्यक युवा साहित्य संमेलन, स. प्रा डॉ. सविता गोविंदवार,संचालन
विद्यार्थीनी प.शै. वि.गों. वि.करिष्मा राऊत हिने तर आभार स. प्रा, अमोल चव्हाण यांनी मानले.
उद्घाटनानंतर पहिल्या सत्रात दास्तांगोईचे सादरीकरण मुंबईचे अक्षय शिंपी व नेहा कुळकर्णी यांनी केले. ‘माडिया व गोंडी भाषा साहित्याचे संवर्धन’ या विषयावर सामाजिक कार्यकर्ते देवाजी तोफा यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद पार पडला. पत्रकार राजेश मडावी, माडीया व गोंडी भाषेचे अभ्यासक नंदकिशोर नैताम, सोनाली मडावी यांनी भाषा संवर्धनाच्या अंगाने मांडणी केली. तिस-या सत्रात निमंत्रितांचे कविसंमेलन पार पडले. उद्घाटन सत्राचे प्रास्ताविक समन्वयक डॉ.सविता गोविंदवार, संचालन संशोधक करीश्मा राखुंडे तर आभार सहायक प्रा.अमोल चव्हाण यांनी मानले.
जीवनवादी साहित्याची निर्मिती आणि विचारांची गरज – डॉ. अभय बंग
आजच्या युवकांपुढे बरीच आव्हाने आहेत. काळ झपाट्याने बदलत आहे. रंजनवादी साहित्यापलीकडे आता जीवनवादी साहित्याची निर्मिती आणि विचारांची गरज असल्याचे मत जेष्ठ समाजसेवक डॉ.अभय बंग यांनी केले.
जगणे समजून साहित्य निर्मिती करावी – डॉ. रवींद्र शोभणे
परंपरा आणि नवतेची सांगड नवलेखकांनी घालणे, समजून घेणे व त्यातून साहित्य निमीत्ती करण्याचे आवाहन ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तथा संमेलनाचे उद्घाटक डॉ.रवींद्र शोभणे यांनी केले.
युवा साहित्यिकांना व्यासपीठ देण्यासाठी विद्यापीठ कटीबद्ध – कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे
युवा साहित्य संमेलन गोंडवाना विद्यापीठ अंतर्गत आयोजित करणे हा नवा अनुभव आहे. पुढील काळात युवा साहित्य संमेलनाची परंपरा कायम ठेवली जाईल. गोंडवना परिसरातील नव्या पिढीतील लेखक, साहित्यिकांना प्रोत्साहन देणार असून विद्यापीठ यासाठी कटीबद्ध राहील असे मत स्वागताध्यक्ष तथा गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी व्यक्त केले.
पाचवे सत्र
गुरुवार दिनांक 22 फेब्रुवारी 2024 रोजी विद्यार्थी कवी संमेलन सुप्रसिद्ध कवी रामटेक डॉ. सावंत धर्मपुरिवार
सहभाग १० विद्यार्थी गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीच्या संलग्न महाविद्यालयातील
सहावे सत्र
कथा कथन
अध्यक्ष सुप्रसिद्ध कथाकार गडचिरोली प्रमोद बोरसरे
कथाकार वर्धेचे आशिष वरघने, नागपूरच्या आभा मुळे, गडचिरोलीचे सत्यनारायण भांडेकर
सातवे सत्र
अभिरूप न्यायालय
लेखक दिग्दर्शक नाट्य कलावंत व चित्रकार अभिरुप आरोपी सदानंद बोरकर
अभिरूप वकील लेखक, कवी
अविनाश पोईनकर
सत्र आठवे
गझल मुशायरा
गझलकार गडचिरोलीचे सुरेश शेंडे , भांडाराचे विविध कापगते, वडसाचे रमेश भुरभुरे, गडचिरोली से मारुती आरेवार,
नागभीडचे अपर्णा नैताम, यवतमाळचे विनोद बुरबुरे, चंद्रपूरचे प्रशांत भंडारे , चिमूरसे गणेश पेंदोर
नववे सत्र
परिसंवाद
साहित्यातील शिक्षण व शिक्षणातील साहित्य
समीक्षक मराठी साहित्य आरमोरीचे डॉ. विजय रैवतकर वक्ते आहेत राजेश्वरी कोटा ,गायत्री सहारे ,सुरज चौधरी आणि यानंतर समारोपाचा कार्यक्रम राहील.