श्री बंकटस्वामी महाविद्यालयाचा “तरुणोत्सव” संपन्न
बीड : श्री बंकटस्वामी महाविद्यालय बीड चे वार्षिक स्नेहसंमेलन “तरुणोत्सव” थाटात संपन्न झाले. या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे महाराष्ट्राचे ख्यातनाम कवी प्राध्यापक अरुण पवार हे होते. या तरुणोत्सव वार्षिक स्नेहसंमेलन प्रसंगी श्री बंकटस्वामी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून व दीप प्रज्वलाने या उत्सवाची सुरुवात झाली याप्रसंगी त्यांनी आपल्या कवितांनी विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले. यामध्ये फेसबुक या विषयावर त्यांनी स्वरचित कविता सादर केले आजच्या तरुणाईला आभासी साधनाने कशा पद्धतीने विळखा घातलेला आहे त्यातून तरुणाईचे संवाद कसा होतो याविषयी त्यांनी कविता सादर केली तसेच आजच्या तरुण पिढीकडून वृद्ध आई-वडिलांची कशा पद्धतीने अवहेलना केली जाते आणि अशाही परिस्थितीत आई-वडील आपल्या मुलाविषयी कशी भावना ठेवतात अत्यंत हृदयस्पर्शी अशी एक कविता सादर केली तसेच वास्तवदर्शी कविता देखील त्यांनी सादर केल्या.
याप्रसंगी श्री बंकटस्वामी शिक्षण संस्था खडकीघाट चे उपाध्यक्ष विक्रमजी भोसले तसेच कनिष्ठ विभागाचे माजी उपप्राचार्य प्रा. बन्सी काळे हे उपस्थित होते. आनंद नगरी, क्रीडा महोत्सव, साहित्य व सांस्कृतिक कार्यक्रम, विविध गुणदर्शन, पारितोषिक वितरण व शेवटी स्नेहभोजन अशा विविध कार्यक्रमाने स्नेहसंमेलन पार पडले. विद्यार्थ्यांनी सर्व कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवून कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घेतला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. विवेक मिरगणे यांनी केले यामध्ये महाविद्यालयातील उल्लेखनीय कार्याचा गौरव केला तसेच वर्षभर विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून महाविद्यालयाचा प्रगतीचा आलेख कशा पद्धतीने वाढत जात आहे याविषयी माहिती दिली. सूत्रसंचालन डॉ. प्रकाश कोंका तर आभार प्रदर्शन उपप्राचार्य डॉ. शिवाजी मोरे यांनी केले. या तरुणोत्सव प्रसंगी कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा. ब्रम्हनाथ मेंगडे तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी तसेच सर्व सहकारी व महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच पालक बहुसंख्येने उपस्थित होते.