डॉ जे जे मगदूम फार्मसी कॉलेज जयसिंगपूर येथे “यिन संवाद” कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला
जयसिंगपूर : डॉ जे जे मगदूम ट्रस्टच्या डॉ जे जे मगदूम फार्मसी कॉलेज आणि सकाळ माध्यम समूहाच्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (यिन) यांच्या संयुक्त विद्यमाने “यिन संवाद” हा खास कार्यक्रम ८ जानेवारी २०२५ रोजी महाविद्यालयाच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून मराठी बिग बॉस फेम अभिनेत्री मीरा जगन्नाथ आणि अभिनेत्री अंकिता लांडे या उपस्थित होत्या. त्या त्यांच्या नवीन मराठी चित्रपट “इलू इलू” च्या प्रमोशनसाठी आल्या होत्या. त्यांच्या उपस्थितीमुळे विद्यार्थी व महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला.
कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ जे जे मगदूम ट्रस्टचे डायरेक्टर डॉ सुनिल आडमुठे यांच्या हस्ते झाले. उपप्राचार्य डॉ सतीश किलजे यांनी यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. यावेळी कॅम्पस डायरेक्टर संदीप रायणावर, डॉ जे जे मगदूम होमिओपथिक मेडीकल कॉलेजचे प्राचार्य डॉ सुनिल बन्ने, जयप्रभा इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य राहुल नवकुडकर, जूनियर कॉलेजच्या प्राचार्या स्मिता पाटील आदि उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शितलकुमार पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. डॉ जे जे मगदूम ट्रस्टचे अध्यक्ष डॉ विजयराज मगदूम आणि उपाध्यकक्षा अॅड डॉ सोनाली मगदूम यांनी या कार्यक्रमासाठी व चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या.
अभिनेत्री मीरा जगनाथ व अंकिता लांडे यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधून करिअर, जीवन व चित्रपटसृष्टीतील अनुभव शेअर केले. यामुळे विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली. “यिन संवाद” कार्यक्रमासाठी चित्रपटसृष्टीतील मान्यवरांची उपस्थिती आणि विद्यार्थ्यांचा सकारात्मक प्रतिसाद यामुळे हा कार्यक्रम अत्यंत यशस्वी झाला. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन प्रा प्रणिल तोरसकर, प्रा सौरभ समडोळे, प्रा रामलिंग माळी, प्रा शुभम पाटील, प्रा रोहन लाटवडे आणि यिन व्यवस्थापक अवधूत गायकवाड यांनी केले. महाविद्यालयीन यिन टीमचे सदस्य यश पाटील व केदार खाडे यांनी कार्यक्रमाच्या नियोजनात महत्त्वाची भूमिका बजावली.