यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या ‘वाचनानंद लेखनानंद’ स्पर्धेचे अंतिम निकाल जाहिर
नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या सर्व शिक्षणक्रमाच्या अध्ययनार्थींना आवांतर वाचन व लेखनाची आवड निर्माण व्हावी आणि दर्जेदार अनुभव लेखन साहित्याची पायाभरणी करण्यासाठी, मुक्त विद्यापीठाच्या महाकवी वामनदादा कडर्क अध्यासन आणि संवाद पत्रिका यांच्या संयुक्त विद्येमाने “वाचनानंद लेखनानंद स्पर्धा (मनोगत लेखन, प्रवास वर्णन लेखन व काव्य लेखन)” आयोजित करण्यात आली होती.
सदर स्पर्धेचा अंतिम निकाल नुकताच जाहिर करण्यात आलेला आहे. विजेते स्पर्धक पुढीलप्रमाणे :
प्रथम क्रमांक – सरिता सुभाष पुनासे, मोर्शी, अमरावती
द्वितीय क्रमांक – सुदर्शन सदाशिव विघ्ने, अमरावती मध्यवर्ती कारागृह
तृतीय क्रमांक (विभागून) – जयश्री सीताराम पवार, पुसद, यवतमाळ
शिवचंद प्राण बनसोड, अमरावती मध्यवर्ती कारागृह.
सर्व विजेत्या स्पर्धकांचे मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा संजीव सोनवणे, प्र-कुलगुरू डॉ जोगेंद्रसिंह बिसेन, कुलसचिव दिलीप भरड यांनी अभिनंदन केले. तज्ज्ञ परीक्षक म्हणून डॉ प्रकाश बर्वे आणि दत्ता पाटील यांच्या समितीने मूल्यांकन केले. परितोषिकाची रक्कम एनईएफटी/ आरटीजीएस द्वारे व प्रमाणपत्रे टपालाद्वारे पाठवण्यात येतील, अशी माहीती महाकवी वामनदादा कर्डक अध्यासनाचे प्रमुख प्रा विजयकुमार पाईकराव यांनी दिली.