मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना आता ‘गृहपाठ ऑनलाईन पद्धतीने’ सादर करण्याची सुविधा

नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने आपल्या कामकाजात प्रगत तंत्रज्ञानाचा समावेश करून शैक्षणिक क्षेत्रामध्ये वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. अलिकडच्या काळात विद्यापीठाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांच्या पदवी प्रमाणपत्रांवर ब्लॉकचेन क्यूआर कोड अंकित करण्यात आलेला आहे. तसेच विद्यापीठाने एबीसी/अपार आयडीच्या नोंदणीमध्ये उल्लेखनीय कामगिरीबद्दल केंद्रिय शिक्षण, कौशल्य विकास आणि उद्योजकता विकास मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते कुलगुरू प्रा संजीव सोनवणे यांचा नवी दिल्ली येथे गौरव करण्यात आला होता.

Yashwantrao Chavan Maharashtra Open University,, Gyan Gangotri, Nashik ycmou

विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये याचाच पुढील टप्पा म्हणून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार तयार करण्यात आलेल्या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना त्यांचे सातत्यपूर्ण मूल्यमापन / अंतर्गत मूल्यमापन करण्यासाठी आवश्यक असलेल्या गुणांकरिता विद्यार्थ्याने हस्तलिखित केलेले गृहपाठ ऑनलाईन  स्वीकारण्यासाठी व त्याचे मुल्यांकन विद्यार्थी ज्या अभ्यासकेंद्रावर प्रवेशित आहे, त्या अभ्यासकेंद्रावरील समंत्रक/शिक्षकांकडून ऑनलाईन मूल्यमापन करण्याची  कार्यप्रणाली व ऑनलाईन पोर्टल विकसित केले आहे. (ऑनलाईन असाईनमेंट सबमिशन अॅण्ड इन्फोर्मेशन सिस्टीम- ओअॅसीस / Online Assignments Submission and Information System- OASIS).

Advertisement

या कार्यप्रणालीमध्ये विद्यार्थ्याना लॉगीन  उपलब्ध करून देण्यात येऊन, त्यात विषयनिहाय गृहपाठाचे प्रश्न, क्यूआर कोड अंकित व त्यांची  वैयक्तिक माहिती असलेली उत्तरपुस्तिका व त्यासोबत सोडवावयाचे गृहपाठाचे प्रश्न असलेली उत्तरपुस्तिका डाऊनलोड व छपाईसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली होती. विद्यार्थ्याने या उत्तरपुस्तिकेवर आपल्या हस्तक्षरामध्ये लिहून त्या पीडीएफ स्वरुपात पोर्टलवर अपलोड करायची होती. अपलोड केलेले गृहपाठ हे ऑनलाईन पद्धतीने समंत्रकांच्या लॉगीनमधून तपासण्यात आलेले होते व त्यांनी दिलेले गुण निकालाच्या कामकाजासाठी उपयोगात आणण्यात आले.

या कार्यप्रणालीमुळे विद्यार्थी कुठूनही, केंव्हाही आपले गृहपाठ तयार करून ऑनलाईन सादर करू शकत असल्याने विद्यार्थ्याच्या वेळेची आणि श्रमाची बचत होणार आहे. यापूर्वी विद्यार्थ्यांना गृहपाठ हे त्याने प्रवेश घेतलेल्या अभ्यासकेंद्रावर जमा करावे लागत होते, तद्नंतर  समंत्रकांनी  तपासल्यानंतर त्यांच्या गुणाच्या नोंदी कराव्या लागत होत्या.

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 अंतर्गत असलेल्या एकूण 14 शिक्षणक्रमांसाठी महाराष्ट्रातील 518 अभ्याकेंद्रातील एकूण २२ हजार ६७८ विद्यार्थ्यांच्या एकूण 1 लाख 9 हजार 465 गृहपाठ विद्यार्थ्यांकडून अपलोड करण्यात आले होते. त्याचे ऑनलाईन पद्धतीने समंत्रकांकडून यशस्वीरित्या मुल्यांकन करण्यात आले. विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने गृहपाठ स्वीकारणारे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ हे राज्यातील पहिले अकृषी विद्यापीठ ठरले आहे. कुलगुरु प्रा संजीव सोनवणे  यांच्या नेतृवत्वाखाली  परीक्षा नियंत्रक भटूप्रसाद पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही  कार्यप्रणाली यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले आहेत.

शैक्षणिक वर्ष  2025-26  मध्ये प्रवेशित झालेल्या सर्व पदवी व पदव्युत्तर पदवी शिक्षणक्रमांच्या विद्यार्थ्यांना गृहपाठ ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याबाबतचा निर्णय झालेला असल्याचेही परीक्षा नियंत्रक भटूप्रसाद  पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page