यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या नव्या नऊ शिक्षणक्रमांना युजीसी–डीईबी ची मान्यता
प्रवेशासाठी शेवटची तारीख १५ नोव्हेंबर
नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी नव्याने सुरू झालेल्या नऊ शिक्षणक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून, इच्छुक विद्यार्थ्यांना १५ नोव्हेंबर २०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करण्याची संधी आहे. विद्यापीठाचे कुलसचिव दिलीप भरड यांनी या प्रवेश प्रक्रियेबाबत माहिती दिली आहे.
विद्यापीठ अनुदान आयोग (युजीसी) आणि दूरशिक्षण परिषद (डीईबी) कडून विद्यापीठाच्या मान्यता प्राप्त मानव्यविद्या, सामाजिकशास्त्र, वाणिज्य व व्यवस्थापन, तसेच संगणक विद्याशाखेतील नऊ नवीन शिक्षणक्रमांना मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये एम ए मास कम्युनिकेशन अँड जर्नालिजम (इंग्रजी माध्यम), एम ए मानसशास्त्र, एम ए राज्यशास्त्र (मराठी व इंग्रजी माध्यम), बी बी ए (इव्हेंट मॅनेजमेंट), बी बी ए (अकौंटिंग अँड फायनान्सीयल मॅनेजमेंट), डिप्लोमा इन ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट, वसतिगृह व्यवस्थापन पदविका, तसेच बी एस्सी डेटा सायन्स यांचा समावेश आहे.
विद्यार्थ्यांनी www.ycmou.ac.in किंवा http://ycmou.digitaluniversity.ac संकेतस्थळावर जाऊन “Admission” टॅबमधील Prospectus २०२४-२५ माहिती पुस्तिका पाहावी. प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज व शुल्क भरण्याची प्रक्रिया विद्यापीठाच्या निर्देशांनुसार पूर्ण करावी.
प्रवेश प्रक्रियेतील तांत्रिक अडचणीसाठी विद्यापीठाच्या विभागीय केंद्रे किंवा विद्यार्थ्यांच्या हेल्पलाईन क्रमांकांवर (०२५३) २२३०५८०, २२३०१०६, २२३१७१४, २२३१७१५ येथे संपर्क साधता येईल. विद्यापीठाच्या कुलसचिवांनी विद्यार्थ्यांना १५ नोव्हेंबर २०२४ च्या आत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.