यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या परीक्षेचे निकाल पुर्नमुल्यांकन करीता अर्ज करता येणार
प्रमाणपत्र, पदवी, पदविका व पदव्युत्तर (कृषि शिक्षणक्रम वगळून) शिक्षणक्रमाच्या विद्यार्थ्यांना व्हेरिफिकेशन (गुणफेरमोजणी), स्कॅन कॉपी, पुर्नमुल्यांकन (Verification/Scan Copy/Revaluation) करीता अर्ज भरण्याबाबत महत्वाच्या सूचना
नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या जानेवारी 2024 मध्ये झालेल्या विविध शिक्षणक्रमाच्या सत्र व पुरवणी परीक्षाचे निकाल विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या निकालाच्या आधारे विद्यार्थ्यांनी दिलेल्या परीक्षेतील संबंधित अभ्यासक्रमास प्राप्त गुणांबाबत पडताळणी करावयाची असल्यास विद्यापीठाच्या धोरणात्मक निर्णयानुसार उत्तरपुस्तिकेबाबत खालील सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.
याबाबतचे विहित नमुने व त्याबाबतच्या सूचना विद्यापीठाच्या www.ycmou.digitaluniversity.ac यासंकेतस्थळावरील होमपेजवर Student Corner या टॅबमधील मुद्दा क्र. 16, 17, 18 मध्ये तसेच दिलेल्या लिंकवर (https://portal.ycmou.org.in/YCMRCRV/Content/StudentRV.aspx) उपलब्ध आहेत. विहित मुदतीतच सदरचा अर्ज ज्या विद्यार्थ्यांना Verification / Scan Copy / Revaluation याकरिता अर्ज करावयाचा आहे, त्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्जासोबत आवश्यक असणारे शुल्क देखील ऑनलाईन पद्धतीनेच अदा करावयाचे आहे. या प्रक्रियेसाठी पुढीलप्रमाणे कालावधी व शुल्क निर्धारित केलेले आहे. विहित मुदतीनंतर ऑनलाईन अर्ज सादर करता येणार नाही. ऑफलाईन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. पोस्टाने अर्ज पाठवू नये. त्यावर विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी. ऑनलाईन अर्ज Link विद्यापीठ होमपेजवर उपलब्ध आहे.
व्हेरिफिकेशन (गुणफेरमोजणी), स्कॅनकॉपी, पुर्नमुल्यांकन हे फक्त जानेवारी 2024 च्या परीक्षेच्या अभ्यासक्रमांच्या उत्तरपुस्तिकांबाबतीतच होईल. व्हेरिफिकेशन (गुणफेरमोजणी), स्कॅनकॉपी व पुर्नमुल्यांकन फक्त तीन अभ्यासक्रमांचे (विषय) करता येईल. पुर्नमुल्यांकनासाठी त्या अभ्यासक्रमाची स्कॅन कॉपी प्राप्त करून घेणे आवश्यक आहे. थेट पुर्नमुल्यांकनासाठीचे अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी.
प्रथम स्कॅन कॉपीसाठी ऑनलाईन अर्ज करून कॉपी मागवावी नंतर पुढील 10 दिवसाच्या आत Revaluation साठी अर्ज करावा. स्कॅन कॉपीसाठी आपला ईमेल ID अचूक लिहावा, ईमेल चुकीचा दिल्यास त्यामुळे स्कॅन कॉपी न मिळाल्यास विद्यापीठ जबाबदार राहणार नाही.
प्रती विषय अभ्यासक्रम शुल्क, ऑनलाईन अर्ज सुरू होण्याचा आणि स्वीकारण्याचा अंतिम दिनांक तपशील पुढीलप्रमाणे – 1. गुणफेरमोजणी (किमान 1, कमाल 3 विषय) : शुल्क – रू. 100/-, ऑनलाईन अर्ज सुरू होण्याचा दि. 28/02/2024, अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दि. 10/03/2024. 2. स्कॅन कॉपी (किमान 1, कमाल 3 विषय) : शुल्क – रू. 200/-, ऑनलाईन अर्ज सुरू होण्याचा दि. 28/02/2024, अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दि. 10/03/2024, 3. पुर्नमुल्यांकन (किमान 1, कमाल 3 विषय): शुल्क – रु. 500/-, ऑनलाईन अर्ज सुरू होण्याचा दि. 28/02/2024, अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दि. 11/03/2024.कुठल्याही परिस्थितीत ऑफलाईन, टपालाने गुणफेरमोजणी अर्ज पाठवू नये, पाठवल्यास स्वीकारले जाणार नाही, त्यावर कार्यवाही करता येणार नाही अशी माहिती परीक्षा नियंत्रक भटूप्रसाद पाटील यांनी दिली.